
Poet Gaddar Passed Away - जातीय आणि वर्गीय शोषणाविरूध्द लढणारा क्रांतिकारी कवी, शाहिर गदर यांचे तेलंगणा येथे दुपारी निधन झाले. मुंबईत १९९२ - १९९३ मध्ये मुंबईत भीषण दंगल झाली. तेव्हा मुंबईतील सांकृतिक संघटनानी जांभोरी मैदानात त्यांच्या शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांची तडफदार शाहिरी, शब्दांचा अंगार यांनी व्यवस्थेवर आसूड ओढले होते. मुंबईत त्यांच्या चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या निधनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमानंतर त्यांचा पुण्यातही कार्यक्रम झाला होता. त्यानंतर नागपूरमध्ये कार्यक्रम होणार होता. मात्र त्या कार्यक्रमाला पोलिसांनी प्रतिबंध केला. शाहिर विलास घोगरे यांचे आणि गदर यांचे मैत्री होती. विलास घोगरे यांचे १५ जुलै १९८७ रोजी निधन झाले,
त्यावेळी त्यांची आदरांजली सभा दादर येथील आंबेडकर भवन येथे आयोजित केली होता. त्या आदरांजली सभेला गदर आले होते. विलास घोगरे यांनी तेलगू कवी चेराबंडा राजू यांच्या कवितांचे भाषांतर केले होते. त्यामुळे त्यांची आणि गदर यांची मैत्री होती.
तेलंगणामध्ये चित्रपटांमध्ये गदर यांच्या गीतांचा वापर झाला आहे. जाती शोषणाच्या आणि वर्गीय शोषणाच्या विरोधात त्यांनी लेखन केले आहे. शाहिर शंतनू कांबळे आणि संभाजी भगत यांचेही गदरशी संबंध होते. गदर हे मुळचे नांदेडचे होते. ते आंध्रप्रदेशमध्ये गेले आणि क्रांतिकारी चळवळीचे ते शाहिर झाले. विद्रोही सांकृतिक चळवळीचे प्रमुख सुबोध मोरे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.