esakal | Sakianaka rape case : बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

dead

Sakianaka rape case : बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Sakianaka rape case : साकीनाका येथे बलात्कार (Sakinaka Rape Case) झालेल्या त्या पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. शनिवारी अखेर त्या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजावाडी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिलेची प्रकृती खूपच चिंताजनक होती. पीडितेवर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते मात्र, दुर्देवाने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे मुंबईसह देशभर आक्रोश केला जात आहे.

मुंबईतील साकीनाका परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. चाकूच्या धाकावर पीडित महिलेला मारहाण करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने महिलेवर अनैसर्गिक अत्याचारही केले. नराधमाने सर्व सीमा पार करत पीडित महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकून गंभीर दुखापत केली होती. आरोपीने केलेल्या या कृत्त्यामुळे पीडित महिलेची अवस्था खूपच चिंताजनक होती. अखेर शनिवारी निर्भयाची मृत्यूशी झुंज संपली. या प्रकरणात तक्रारदार असलेल्या सुरक्षा रक्षकाने दोन व्यक्ती महिलेला धमकावत असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला केला होता.

मुंबईतील निर्भयाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा किशोर वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत आपला राग व्यक्त केला. 'साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली.माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. पण, या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही, त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून १ नंबर लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना. नाही वाचवू शकलो तुला'

नेमकं काय घडलं?

अंधेरीमधील साकीनाका परिसरात (Sakinaka area) टेम्पोमध्ये गुरुवारी रात्री (rape on women) महिलेवर बलात्कार करण्यात आला. अत्यंत अमानुष पद्धतीने या महिलेवर अत्याचार करण्यात आला. मोहन चौहान असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. आरोपीने अत्याचार केल्यानंतर रॉडसारख्या वस्तूने महिलेला जखमी केले आहे

loading image
go to top