Mumbai School Election महाविद्यालयांत यिन निवडणुका लवकरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School Election

Mumbai School Election : महाविद्यालयांत यिन निवडणुका लवकरच

मुंबई : सकाळ माध्यम समूह आयोजित यिन नेतृत्व विकास कार्यक्रम अंतर्गत ‘यिन’ निवडणूक प्रक्रिया नऊ जानेवारी 2023 पासून तीन टप्प्यांमध्ये होत आहे. महाविद्यालयीन तरुणांमध्ये यिन निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यभरातील दोन हजारांहून अधिक महाविद्यालयात ‘यिन’ निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान नऊ जानेवारी 2023 रोजी होईल.

राज्यभरातील विविध महाविद्यालयातील उमेदवार अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात यिन निवडणुकीत सहभागी होत असतात. या संपूर्ण प्रक्रियेत महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विविध शाखेचे विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना यिन निवडणुकीबद्दल मार्गदर्शन करत असतात. राज्यातील सर्व महाविद्यालयात पोस्टर्स, बॅनर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाचे यिन व्यासपीठ सज्ज झाले आहे.

राज्यातील विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्‍वगुण विकसित करतांना त्‍यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘सकाळ माध्यम समूहाचे ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात ‘यिन’ या व्‍यासपीठाद्वारे केले जाते. ‘यिन’च्या माध्यमातून नेतृत्व विकास कार्यक्रम अर्थात निवडणूक व मतदान प्रक्रिया ॲपच्या साह्याने ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करणे, मतदान करण्याअगोदर ‘यिन’चे ॲप प्रत्येक मतदाराने मोबाईल मध्ये डाऊनलोड करून, नोंदणी झालेला सदस्य क्रमांक दाखवणे गरजेचे आहे.

आणि महाविद्यालयाचे आयडी कार्ड सोबत आणणे, हे दोन पुरावे दाखवणाऱ्या त्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्याला आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देण्याचा अधिकार मिळेल. मतदान हे महाविद्यालयातच मतपत्रिकेद्वारे मतपेटीत गुप्तपणे टाकून करण्यात येणार आहे.

  • असा असेल निवडणूक कार्यक्रम

पहिली फेरी : शहर

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात ता. २० डिसेंबर २०२२.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ५ जाने. २०२३.

मतदान : ९ जाने. २०२३.

दुसरी फेरी : शहर

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात ता. २० डिसेंबर २०२२.

उमेदवारी अर्ज दाखल

करण्याची शेवटची तारीख १२ जाने. २०२३.

मतदान : १६ जाने. २०२३.

पहिली फेरी : ग्रामीण

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात ता. २० डिसेंबर २०२२.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ८ जाने. २०२३.

मतदान : १२ जाने. २०२३.

दुसरी फेरी : ग्रामीण

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात ता. २० डिसेंबर २०२२.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख

१५ जाने. २०२३.

मतदान : १९ जाने. २०२३.

तिसरी फेरी :शहर + ग्रामीण

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात ता. २० डिसेंबर २०२२.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ जाने. २०२३.

मतदान : २३ जाने. २०२३.