esakal | विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! मुंबईतल्या शाळा सुरु होणार; महापौरांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai schools

मुंबईतल्या शाळा ‘एक दिवसाआड’ सुरु होणार - महापौर पेडणेकर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : मुंबईतल्या शाळा (mumbai school) सुरु होणार आहेत. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरु होणार आहेत. नियमावलीनुसार एकदिवसाआड शाळा भरतील. एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसायला परवानगी असणार आहे. अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

कधीपासून सुरू होणार शाळा?

कोरोना अजूनही संपला नाही. सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. आता आपणही काळजी घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरु होतील. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसायला परवानगी असणार आहे. तसंच विद्यार्थ्याला शाळेत यायला पालकांची परवानगी असणार आहे

काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर.-

-शाळा व्यवस्थापन समिती पालकांच्या संमतीसाठी अर्ज दिला जाईल. पालकांच्या संमतीपत्रानंतर त्यांच्या मुलांना शाळेत घेतले जाईल.

- एका बेंचवर एकच मुलगा बसेल. मुलांना मास्क, सॅनिटायझर पालिका देईल.

- सर्व शिक्षकांचे डोस पूर्ण झालेत

- एखाद्या वर्गातील सर्वच मुलांच्या पालकांनी संमती दिल्यास, असे वर्ग अल्टरनेट डे चालवले जातील

- एकूण २९ मुलांना कोरोनाची लागण झालीय.यात केईएमचे २३ विद्यार्थी आहेत. ऊर्वरीत विद्यार्थी हे इतर मेडिकल कॉलजचे आहेत. सौम्य लक्षणे असलेल्यांना क्वारंटाईन केलंय. तर लक्षणे असणा-यांना एडमिट केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम घेतल्याचे समजतंय

- सर्वांचे मत घेतल्यानंतर शाळा सुरू केल्या जातायत.

- मुलांची हजेरी सक्तीची केली जाणार नाही

क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांना लागण - महापौर

केईएम रुग्णालय व सेठ जीएस मेडिकल कॉलेजमधील २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मागील दोन-तीन दिवसांतच सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांसाठी क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात त्यांनी भाग घेतला होता. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचं महापौर पेडणेकर यांनी सांगतिलं. कोरोनाची लागण झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे वसतिगृह सील करण्यात येण्याची शक्यता आहे.

राज्यात 49 जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाने आणखी 49 जणांचा मृत्यू झाला आहे. या साथीच्या विखळ्यात सापडलेल्या 1 लाख 39 हजार 11 जणांना आतापर्यंत प्राणास मुकावे लागले आहे तर एकूण 63,68,530 रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. आतापर्यंत 1 लाख 39 हजार 11 रुग्ण कोरोनाने दगावले. काल 3 हजार 187 नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. दिवसभरात 3 हजार 253 रुग्ण बरे होऊन परतले घरी. तर राज्यात कालपर्यंत एकूण 63,68,530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के एवढे झाले आहे.

loading image
go to top