Mumbai News: बेस्टच्या २८० मिनी बसेसची सेवा समाप्त;कराराचे पालन न केल्याने बेस्टची कारवाई

सेवा सुधारण्यासाठी कंत्राटदार कंपनीलालबेस्ट उपक्रमाने अनेकदा नोटीसा बजावल्या. परंतु सेवेत सुधारणा होत नसल्याने अखेर बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आला.
best bus protest mumbai
best bus protest mumbai esakal news

Mumbai News- मुंबईत चिंचोळ्या मार्गातून धावणाऱ्या भाडेतत्त्वावरील मिनी बसेसचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे बेस्टच्या ताफ्यातील २८० बसेस कमी झाल्या आहेत. करारानुसार अटी आणि शर्थींचे पालन न केल्यानेच हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आला.

मुंबईकरांना सेवा पुरविणाऱ्या २८० मिनी बसेसची सेवा अतिशय सुमार होती. त्यामध्ये चालणारा एसीदेखील पुरेशा क्षमतेचा नसल्याने तसेच देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराने नीट पार न पाडल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक स्थानकांवर चिंचोळ्या जागेतून मार्ग काढण्यासाठीचा बेस्ट पर्याय उपक्रमाकडून यापुढे उपलब्ध होणार नाही.

सेवा सुधारण्यासाठी कंत्राटदार कंपनीलालबेस्ट उपक्रमाने अनेकदा नोटीसा बजावल्या. परंतु सेवेत सुधारणा होत नसल्याने अखेर बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आला, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. या कंपनीला मोठा दंडही ठोठावला असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिगर्दीच्या ठिकाणी स्टेशनपासून सेवा देणाऱ्या मिडी बसेसला चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु बसेसची फ्रिक्वेन्सी आणि मेंटेनन्स या मुद्द्यावरून हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आला.

सगळ्याच मार्गावर या बसेसला भरपूर प्रतिसाद मिळत होता. या बसेसची क्षमता ३५ होती, त्यामध्ये २१ प्रवाशांना बसण्याची व्यवस्था होती. परंतु गर्दीच्या वेळेत ५० हून अधिक प्रवासी बसने प्रवास करत होते.

करारानुसार कंत्राटदाराला बेस्ट उपक्रमाकडून देय असलेली ३ कोटी रक्कम रोखण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टच्या कंत्राटी ड्रायव्हरचे शिष्टमंडळ महाव्यवस्थापक लोके‌श चंद्र यांना काही दिवसांपूर्वी भेटले. बेस्ट उपक्रमाकडून कंत्राटाच्या करारानुसार सुरक्षित ठेवेची रक्कम गोठवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com