Mumbai : पालिका मुख्यालयात एसआयटीची झाडाझडती; विकास नियोजन खात्यासह विभाग कार्यालयांचीही चौकशी

कोरोना सेंटरच्या कामांत, भूखंड खरेदी, विना निविदा कामाचे आदेश दिले अशा विविध कामांत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत एसआयटीच्या टीमकडून सध्या चौकशी सुरु आहे.
bmc scam
bmc scamsakal

मुंबई - कोरोना काळातील घोटाळ्याची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. आज मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात एसआयटीची टीम दाखल झाली होती.

पाचव्या मजल्यावरील विकास नियोजन विभागात व त्यानंतर काही वॉर्डातही या टीम दाखल झाल्या होत्या. यावेळी भूखंड खरेदी प्रकरणासह विविध कामांच्या फाईल्स एसआयटीच्या टीमने ताब्यात घेतल्याचे समजते. त्यामुळे अधिका-यांचे धाबे दणाणले आहे.

कोरोना सेंटरच्या कामांत, भूखंड खरेदी, विना निविदा कामाचे आदेश दिले अशा विविध कामांत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत एसआयटीच्या टीमकडून सध्या चौकशी सुरु आहे. मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर उभारण्यात आले.

bmc scam
Mumbai : नीलम गोर्हेंसह त्या तिघांवर अपात्रतेची कारवाई

मात्र कोविड सेंटरच्या कामांत अनियमितता झाली असून साडेतीन हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध कामांत १२ हजार कोटींच्या कामांत अनियमितता झाली असून याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयटीची स्थापना केली. पालिकेच्या कामांत अनियमितता झाल्याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची टीमने आज पालिका मुख्यालयासह काही वॉर्डातील विविध विभागांत चौकशी केली आणि महत्वपूर्ण फाईल्स ताब्यात घेतल्याचे समजते.

bmc scam
Mumbai Rain : मुंबईत जोरदार पाऊस; रस्ते वाहतूक मंदावली

पालिकेतील अनियमितता कामांचे ऑडिट कॅगच्या टीमकडून करण्यात आले. त्यानंतर ईडीकडून चौकशी सुरु असून तत्कालीन माजी अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त रमाकांत बिरादार यांची ईडीने चौकशी केली.

आता एस आयटीच्या टीमकडून पालिकेच्या कामांची झाडाझडती घेतली जात असल्याचे समजते. त्यामुळे पालिका अधिका-यांमध्ये कमालिची भिती भीती निर्माण झाली आहे.

bmc scam
Mumbai News : मार्वे बीच लगत समुद्रात 5 मुले बुडाली.. दोघांना वाचवण्यात यश तिघांचा शोध सुरू

कामांची चौकशी -

- कोरोना काळातील कामांची नोंदणी नाही

- कोरोना काळात विना निविदा मागवता कामे दिली

- राज्य सरकारच्या नियमानुसार ५ कोटींच्या वरील कामासाठी थर्ड पार्टी ऑडिट करणे गरजेचे, पण ३,३५५.५७ कोटींची १३ कामांचे थर्ड पार्टी ऑडिट केले नाही

- कामे देताना कंत्राटदारांचा इतिहास बघितला नाही, परिणामी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले.

- मुंबई महापालिका प्रशासनाने विना निविदा २१४.४८ कोटींची कामे दिली

- ६४ कंत्राटदारांना विना निविदा ४,७५६ कोटींची कामे दिली पण करार केलेला नाही

- दहिसर येथील भूखंड ७१६ जादा टक्क्यांनी खरेदी केला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com