esakal | Mumbai: लवकरच एसटीच्या पती-पत्नी एकत्रिकरणाच्या बदल्या होणार
sakal

बोलून बातमी शोधा

यशोमती ठाकूर

मुंबई : लवकरच एसटीच्या पती-पत्नी एकत्रिकरणाच्या बदल्या होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेले तीन वर्षे एसटी महामंडळात पती-पत्नी एकत्रीकरणाच्या बदल्या रडखडल्या असून त्याचा फटका दीडशे हुन अधिक कर्मचाऱ्यांना बसला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना नवरात्रोत्सवाची भेट मिळावी यासाठी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. राज्य शासना मधील कर्मचाऱ्यांच्या पती पत्नी एकत्रीकरण बदल्या करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

नवरात्रौत्सव सुरू असताना महिला कर्मचाऱ्यास एक आगळी वेगळी भेट मिळावी यासाठी प्रयत्न केला. त्याच प्रमाणे एसटीतील पतिपत्नीच्या एकत्रीकरणासाठी ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारच्या पती पत्नी एकत्रीकरण बदली नियमानुसार एसटी मधील पती पत्नी एकत्रीकरण बदल्या करण्यात याव्यात अशी आग्रही मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी ठाकूर यांना प्रत्यक्ष भेटून केली होती.त्याला तात्काळ प्रतिसाद देत त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून एसटी मधील पती पत्नी एकत्रीकरण बदल्या करण्यात याव्यात असे पत्र दिले आहे.

हेही वाचा: पुणे : रुपी’ साठी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरना साकडे

कोरोना काळात एसटी मधील महिला व पुरूष कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता मुंबईकरांची सेवा उत्तम रीतीने बजावली असून त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याना ज्या सोई सुविधा मिळाल्या त्या मिळाल्या नाहीत. तरीही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निदान नियमानुसार होणाऱ्या बदल्या करण्यात आल्या पाहिजेत.पण त्या विनाकारण प्रलंबित आहेत.

चालक-वाहक यांत्रिक कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी अशा एकूण 164 बदल्या तीन वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित असून पर्यवेक्षक व अधिकारी अशा एकूण 28 बदल्या प्रलंबित आहेत. एसटीमध्ये काम करीत असलेल्या महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी रहावे लागत असल्याने त्यांना कौटुंबिक त्याच प्रमाणे विविध समस्याना सामोरे जावे लागत असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले आहे.

loading image
go to top