Mumbai: कर्मचारी संपावर तर, सचिव ‘परदेशवारी’वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

कर्मचारी संपावर तर, सचिव ‘परदेशवारी’वर

sakal_logo
By
संजय मिस्कीन

मुंबई : राज्यभरात एसटी कर्मचारी संपावर असताना वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मात्र हवाई सफर करत परदेशवारीत व्यग्र आहेत. ‘ग्लास्गो’ येथे जागतिक पर्यावरण परिषदेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

पण मुख्यमंत्री कार्यालयाचे कामकाज पाहणारे व वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आणि त्यांच्या पत्नी आणि उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर देखील या परदेश दौऱ्यात सहभागी झाल्या आहेत.

हेही वाचा: जातीय तेढ निर्माण करू नका : दिलीप वळसे पाटील

सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या दौऱ्याबाबत विचारणा केल्याचे समजते. सनदी अधिकाऱ्यांना परदेश दौरा करताना सरकारची परवानगी आवश्यक असते. तर जागतिक परिषदेत केवळ निमंत्रितांनाच सहभागी होण्याची संधी असते.

loading image
go to top