
Latest Mumbai News: वर्षानुवर्षे रखडलेल्या म्हाडाच्या भूखंडावरील एसआरए प्रकल्पांच्या कामाला वेग येणार आहे. म्हाडाने निश्चित केलेल्या १७ प्रकल्पांपैकी चार प्रकल्प ताब्यात घेण्यासाठी एसआरए प्राधिकरणाला हेतू पत्र (एलओआय) सादर केले आहेत. त्यामध्ये कुर्ला येथील दोन, तर जोगेश्वरी येथील दोन प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आर्किटेक्ट आणि विकसकाची म्हाडाकडून लवकरच नियुक्ती केली जाणार आहे.
म्हाडाच्या भूखंडावरील झोपड्यांचा, जुन्या चाळींचा एसआरए योजनेंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार होता; मात्र विविध कारणास्तव हा पुनर्विकास वर्षानुवर्षे रखडला आहे. त्यामुळे तो मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने एसआरए आणि म्हाडामधील सह-भागीदारीला (जॉईंट व्हेंचर) मंजुरी दिली आहे. त्यातून निवडलेल्या १७ प्रकल्पांपैकी चार प्रकल्पाच्या ‘एलओआय’चा प्रस्ताव एसआरएला दिला आहे.
----