सिग्नल मोडला आणि सापडली चोरी झालेली स्कुटी, मुंबईतील घटना

ड्युटीवर असणारे वाहतूक पोलीस संजय दळवी आणि संजयकुमार यांनी आरोपींचे फोटो काढले आणि स्कुटी पोलीस वाहतूक चौकीवर घेऊन गेले.
सिग्नल मोडला आणि सापडली चोरी झालेली स्कुटी, मुंबईतील घटना

मुंबई: बातमीचं शीर्षक वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण रविवारी मालाडच्या एस.व्ही.रोडवर हा प्रकार घडला. आरोपींनी सिग्नल मोडला (jumps signal) आणि स्कुटी चोरीची (Stolen scooty) घटना उघड झाली. दोन आठवड्यांपूर्वी गोरेगाव पश्चिमेहून स्कुटीची चोरी झाली होती. एसव्ही रोडवर (sv road) स्कुटीवर बसलेल्या दोन आरोपींनी सिग्नल मोडला. त्यावेळी तिथे बंदोबस्ताला असलेल्या वाहतुक पोलिसांनी (traffic police) आरोपींना पकडलं व त्यांच्याकडे लायसन्स आणि पेपरची मागणी केली.

पण मुळातच स्कुटी त्यांच्या मालकीची नसल्यामुळे ते कागदपत्र सादर करु शकले नाहीत. त्यावेळी वाहतुक पोलिसांनी ती स्कुटी ताब्यात घेतली. कागदपत्र दाखवून स्कुटी घेऊन जाण्यास सांगितले. पण ते आरोपी परतलेच नाहीत. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

सिग्नल मोडला आणि सापडली चोरी झालेली स्कुटी, मुंबईतील घटना
दोन डोस घेतलेल्यांना पुन्हा तिसऱ्याची आवश्यकता आहे का ? हायकोर्टाचा सवाल

ड्युटीवर असणारे वाहतूक पोलीस संजय दळवी आणि संजयकुमार यांनी आरोपींचे फोटो काढले आणि स्कुटी पोलीस वाहतूक चौकीवर घेऊन गेले. "आरोपींना तासाभरात कागदपत्र घेऊन येण्यास सांगितले होते. पण ते आलेच नाहीत. आम्ही ई-चालान अ‍ॅप्लिकेशनवर बाईकचा नंबर तपासला आणि मालक विजय शुक्ला यांचा नंबर मिळवला" असे संजय दळवी यांनी सांगितले.

सिग्नल मोडला आणि सापडली चोरी झालेली स्कुटी, मुंबईतील घटना
जुलै महिन्यात कार विक्रीची धूम ! मारुती, हुंदाईचा आलेख उंचावला !

"आम्ही शुक्ला यांना फोन करुन सिग्नल मोडल्यामुळे तुमची स्कुटी आमच्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी आपली स्कुटी चोरी झाली असून गोरेगाव पोलीस ठाण्यात १२ जुलैला तक्रार नोंदवल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर आम्ही लगेच गोरेगाव पोलिसांना याची माहिती दिली'' असे संजय दळवी यांनी सांगितले. स्कुटी परत मिळाल्यानंतर विजय शुक्ला यांनी टि्वटच्या माध्यमातून पोलिसांचे आभार मानले. पोलीस आरोपींना लवकरच पकडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com