Dombivli News : धक्कादायक! भूताटकीच्या संशयातून ज्येष्ठ नागरिकाला आगीच्या निखाऱ्यावर नाचविले

मुरबाड तालुक्यातील धक्कादायक घटना; वृद्ध होरपळून गंभीर जखमी
mumbai Superstition case old age person injured thane
mumbai Superstition case old age person injured thaneSakal
Updated on

डोंबिवली - अघोरी कृत्य करून गावात भूताटकी करत असल्याच्या संशयातून ग्रामस्थांनी एका ज्येष्ठ नागरिकाला आगीच्या जळत्या निखाऱ्यावर नाचविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या केरवेळे गावात घडली आहे.

यामध्ये 75 वर्षीय लक्ष्मण हे आगीत होरपळून गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या केरवेळे गावात लक्ष्मण भावार्थे हे वयोवृद्ध कुटूंबासह राहतात. त्यातच या गावातील काही ग्रामस्थांना वृद्ध लक्ष्मण यांच्यावर संशय होता कि, वृद्ध लक्ष्मण हे तंत्रमंत्र विद्या आणि अघोरी कृत्य करून भूताटकी करत असल्याचा संशय होता.

त्यातच 4 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास केरवेळे गावात मंदिरसमोर ग्रामस्थांनी जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या रात्री जागरणाचा गोंधळ सुरू असताना त्याच गावात रहाणारे 15 ते 20 जण वृद्ध लक्ष्मण भावार्थे यांच्या घरात घुसून त्यांना घराबाहेर ओढत नेले.

त्यानंतर जागरणाच्या ठिकाणी घेऊन गेले व आग पेटवली होती त्या आगीच्या निखाऱ्यावर नाचविले. हा भयानक प्रकार करीत असतानाच, वृद्ध लक्ष्मण यांना काही तरुण ग्रामस्थ 'तू करणी करतो' असे म्हणून त्याला मारहाण देखील करण्यात आल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, आगीच्या जळत्या निखाऱ्यावर नाचविल्याने त्या 75 वर्षीय वृध्द लक्ष्मणला होरपळून गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या पायाला फोड होऊन गंभीर भाजले तसेच पाठीवर देखील जळाल्याने अंगाच्या कातड्या जळाल्या आहेत.

या बाबत लक्ष्मण भावार्थे यांच्या मुलीने मुरबाड पोलिस स्टेशन गाठले असून अद्याप ही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या संर्दभात मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रमोद बाबर यांच्याशी संपर्क साधला सद्या मी बाहेर असून पोलीस ठाण्यात गेल्यावर आपणास अधिक माहिती कॉल करून देण्यात येईल,

असे बोलून अधिक बोलणे टाळल्याने राजकीय दबावापोटी अद्यापही गुन्हा दाखल होत नसल्याची माहिती सूत्राने दिली आहे. मात्र काही वेळाने पुन्हा कॉल करून माहिती दिली कि, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीचा शोध सुरू केल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com