मुंबईकरांनो काळजी घ्या! शहराच्या तापमानाचा पारा वाढतोय

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 20 April 2020

मुंबई तापली; पारा @37.8 अंश सेल्सिअस
पुढील चार दिवसांत तापमान कमी होण्याची शक्यता 

मुंबई : मुंबईच्या तापमानात वाढ होत असून पारा 35 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. सोमवारी (ता. 20) सांताक्रुझ येथे 37.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. रविवारी शहरातील तापमान 35 अंश सेल्सिअस होते. आतापर्यंत एप्रिल महिन्यातील  हे सर्वाधिक तापमान आहे. सध्या तापमान वाढत असले तरी, हळू हळू तापमानात घट होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोमवारी कुलाबा येथे कमाल तापमान 35.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेल. मुंबई उपनगरात मुलूंड पश्चिम आणि कालिदास येथे सर्वाधिक 39.98 अंश सेल्सिअसची नोंद झाली. त्याखालोखाल जोगेश्वरी लिंक रोड येथे 39..70 अंश सेल्सिअस, बोरीवली पूर्वमध्ये 39.40, तर गोरेगाव येथे 38.80 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यात दिलासा म्हणजे, पुढील चार दिवसांत कोकणासह मुंबईत तापमान हळूहळू कमी होईल. आकाश निरभ्र राहील, अशी शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा
 
किमान तापमना (अंश सेल्सिअसमध्ये)
कुलाबा - 27.2
सांताक्रुझ - 26.4 

हवेतील आर्द्रतेचे प्रमाण
कुलाबा - 62 टक्के
सांताक्रुझ - 31 टक्के


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Tapali; Mercury @ 37.8 degrees Celsius

टॉपिकस
Topic Tags: