esakal | इमारतीतील छत कोसळून दोन जखमी; माटुंगा लेबर कॅम्पमधील घटना | Mumbai tragedy
sakal

बोलून बातमी शोधा

terrace collapsed

इमारतीतील छत कोसळून दोन जखमी; माटुंगा लेबर कॅम्पमधील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धारावी : माटुंगा (Matunga) लेबर कॅम्प येथील मिलिंदनगर गृहनिर्माण सोसायटीत ए विंगच्या चौथ्या मजल्यावरील एका घरातील छत सकाळी आठ वाजता कोसळून (Building terrace collapsed) ऋषिकेश पाटील व त्याचा भाऊ अभिषेक पाटील हे दोघे किरकोळ जखमी (two injured) झाले आहेत. या घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: सदस्यांना प्रत्यक्ष हजेरी लावण्याची परवानगी का नाही? न्यायालयाचा सवाल

दोघे तरुण झोपेत असताना ही घटना घडली. या इमारतीत यापूर्वी स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या असल्याने रहिवासी चिंताग्रस्त आहेत. यासंदर्भात शाहूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक पालव यांना संपर्क केला असता त्यांना घटनेची माहिती नसल्याचे उत्तर मिळाले.

"अशी घटना घडली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती पावले उचलण्यास सांगतो. सविस्तर माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू."
- किरण दिघावकर, सहायक आयुक्त, ग/उत्तर विभाग.

loading image
go to top