esakal | मुंबईतील 22,483 कुटुंबीयांचे धोकादायक ठिकाणी वास्तव्य, दुर्घटनेची भीती !
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील 22,483 कुटुंबांचे धोकादायक ठिकाणी वास्तव्य, दुर्घटनेची भीती !

मुंबईतील 22,483 कुटुंबांचे धोकादायक ठिकाणी वास्तव्य, दुर्घटनेची भीती !

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईतील 22,483 कुटुंबाचे (Mumbai Families) धोकादायक ठिकाणी वास्तव्य असून याठिकाणी एखादी दुर्घटना होऊन जीवितहानी (Accidental Death) होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबईत मागील 29 वर्षात दरडी कोसळून (Land Collapse) झालेल्या दुर्घटनेत 290 लोकांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मुंबईतील 36 पैकी 25 मतदारसंघात 257 ठिकाण डोंगराळ भागात (Mountain) धोकादायक म्हणून वर्गीकृत आहे. ( Mumbai Thousands of families home at Dangerous places information By RTI Anil Galgali-nss91)

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून हे समोर आणले आहे. डोंगराळ भागातील 22,483 झोपड्यांपैकी 9657 झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते असे गलगली यांनी सांगितले. पावसाळ्यात 327 ठिकाणी भूस्खलनाचा धोका असल्याबाबत ही अनिल गलगली यांनी महाराष्ट्र सरकारला पत्राद्वारे आधीच सतर्क केले होते.

हेही वाचा: 'या' निर्णयाबाबत प्रविण दरेकरांचे राज्य सरकारवर टीकास्त्र, म्हणाले...

वर्ष 1992 ते 2021 या दरम्यान दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 290 लोकांनी जीव गमावला असून 300 हून अधिक जखमी झाले आहेत. 2010 मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार्‍या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने धोकादायक परिसराच्या संरक्षणाबाबत शिफारस केली होती. मात्र त्यावर अद्याप कार्यावही झाली नाही. मंडळाच्या अहवालानंतर 1 सप्टेंबर 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. तथापि, त्यानंतर दहा वर्षे उलटून गेली आहेत परंतु नगरविकास विभाग अद्याप त्याची अंमलबजावणी केली नाही किंवा कोणताही अ‍ॅक्शन टेकिंग प्लॅन (एटीपी) तयार झाला नाही, असे गलगली पुढे म्हणाले.

loading image