'तुम्हीच सांगा आम्ही कसं काम करायचं?' मुंबईतील व्यापाऱ्यांचा संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'तुम्हीच सांगा आम्ही कसं काम करायचं?' मुंबईतील व्यापाऱ्यांचा संताप

'तुम्हीच सांगा आम्ही कसं काम करायचं?' मुंबईतील व्यापाऱ्यांचा संताप

मुंबई: कोरोनाच्या (corona virus) डेल्टा प्लस (delta plus) व्हेरिएंटची भीती दाखवून नवीन निर्बंध लावण्यात आले आहेत. तीन आठवड्यांपूर्वी सरकारने जिल्हास्तरीय पाच लेव्हल ठरवल्या होत्या. त्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजनवर किती रुग्ण आहेत? त्यानुसार त्या जिल्ह्यातील निर्बंध (restriction) कमी केले जात होते. पण आता पहिल्या दोन लेव्हल सरकारने रद्द केल्या आहेत. राज्य सरकारने (state govt) घेतलेल्या या निर्णयाचा नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे. (Mumbai traders upset with thackeray govt new restrictions)

मुंबईतील व्यापारी वर्गात तर तीव्र संतापाची भावना आहे. मुंबई मागच्याच आठवड्यात लेव्हल १ मध्ये होती. म्हणजे सर्व अनलॉक होणं अपेक्षित होतं. पण BMC ने मुंबईला लेव्हल ३ मध्ये ठेवलं आहे. त्यामुळे दुकानं दुपारी ४ पर्यंत उघडी ठेवता येतात. मुंबईतील व्यापारी असोसिएशनचे नेते विरेन शहा यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: लसीच्या दोन डोसनंतर मुंबईत इतक्या लोकांना झाली कोरोनाची बाधा

"भारतात दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात या सर्व ठिकाण दुकाने, हॉटेल, जीम, मॉल, सार्वजनिक वाहतूक सुरु आहे. काही राज्यांमध्ये दुकाने संध्याकाळी सात, आठ, नऊ आणि १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी आहे. फक्त महाराष्ट्रातच दुकानं, हॉटेलसाठी चार वाजेपर्यंतची वेळ आहे" असे व्यापारी असोसिएशनचे नेते विरेन शहा म्हणाले.

हेही वाचा: 'सर्व चाव्या फडणवीसांकडे तर मग पाठीत खंजीर का खुपसला?'

"अन्य राज्यांनी आपल्या आर्थिक व्यवहारांना चालना दिली आहे. महाराष्ट्रात मात्र डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येईल, असं बोलल जातय. तुम्हीच सांगा महाराष्ट्रात आम्ही व्यापाऱ्यांनी कसं काम करायचं? ४ वाजेपर्यंतची वेळ व्यवहार्य नाही, हे आम्ही शासनाला अनेकदा लक्षात आणून दिलय. सर्वच दुकानदारांना आठ वाजेपर्यंतची वेळ वाढवून द्या, अशी आमची मागणी आहे. आम्ही अपेक्षा करतो की, महाराष्ट्र सरकार आमच्या मागणीची दखल घेईल" असे विरेन शाह म्हणाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top