esakal | खासगी केंद्रात कोरोना लसीकरणाला वेग; आठवड्याभरात 55 टक्के हिस्सा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

खासगी केंद्रात कोरोना लसीकरणाला वेग; आठवड्याभरात 55 टक्के हिस्सा

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : लोकलप्रवसासाठी (Mumbai train) कोविड प्रतिबंधीत लसीचे दोन डोस (corona vaccination) घेणे बंधनकारक आहे. तर,दुसऱ्या बाजूला महापालिका (bmc),सरकारी लसीकरणात लसीचा साठा मर्यादित (limited vaccine stock) असल्याने खासगी केंद्रांमधून (private vaccination center) विकत लस घेण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या सहा दिवसात झालेल्या लसीकरणापैकी 55 टक्के लसीकरण खासगी केंद्रात झालेले आहे.

हेही वाचा: नायर रुग्णालयासाठी 100 कोटींचा विशेष निधी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली आहे. मात्र,सार्वजनिक क्षमतेच्या 75 आणि खासगी लसीकरणच केंद्राचा 25 टाका वाटा लसीकरणात राहील असे सुत्र ठरविण्यात आले आहे. मात्र, मुंबईतील सार्वजनिक लसीकरण केंद्रांमध्ये मर्यादित साठा असल्याने त्यांचा टक्का घसरला आहे.

सोमवार पासून शुक्रवारी पर्यंत मुंबईत 5 लाख 939 जणांना लस देण्यात आली.त्यातील 2 लाख 76 हजार 765 मात्र खासगी केंद्रांमधून देण्यात आली असल्याचे आकडेवारी वरुन स्पष्ट होते.याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र,संपर्क होऊ शकला नाही.त्यातच गेल्या दोन दिवसात खासगी केंद्रांमध्ये होणाऱ्या लसीकरणाचे प्रमाण जास्त वेगाने वाढत असल्याचे आकडेवारी स्पष्ट दिसत आहे.

दोन डोसच्या अटीमुळे वाढ

राज्य सरकारने लोकल प्रवास करण्यासाठी लसीचे दोन डोस घेण्याची अट बंधनकारक केली आहे.मात्र,सार्वजनिक केंद्रांत लस उपलब्ध नसल्याने नोकरदारांना खासगी केंद्रांमधून लस घ्यावी लागते.यात प्रत्येक डोससाठी 1 हजार ते 1200 रुपये मोजावे लागत आहे.

हेही वाचा: 'शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काचे घर द्या'; महिलांचा धडक मोर्चा

असा वाढला खासगी केंद्रांचा हिस्सा

-दिवस - खासगी केंद्र - सार्वजनिक केंद्र

-30 ऑगस्ट - 78,920----82,918

-31 ऑगस्ट - 43,662---11060

-1 सप्टेंबर - 45,204---89,794

-2 सप्टेंबर - 42,613---24,085

-3 सप्टेंबर - 66,366--16,317

आतापर्यंतचे लसीकरण

- 93 लाख 5 हजार 662 डोस देण्यात आले.

-24 लाख 89 हजार 844 नागरीकांना दोन डोस.

-68 लाख 15 हजार 778 नागरीकांना पहिला डोस.

loading image
go to top