esakal | सर्वसामान्य प्रवाशांची पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वसामान्य प्रवाशांची पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी

कोकणात, महाराष्ट्रात जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वे सुरू करून इतर एक्सप्रेसला जनरल अनारक्षित बोगी जोडण्याची मागणी  प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे.

सर्वसामान्य प्रवाशांची पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई  : सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू केल्या नाहीत. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या अनेक पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद आहेत. इतर एक्सप्रेसला जनरल अनारक्षित बोगी नाही. त्यामुळे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांचाच रेल्वे प्रवास होत आहे. तर,  कोकणासह महाराष्ट्रात जाणाऱ्या रेल्वेची प्रतीक्षा यादी भली मोठी आहे. परिणामी, गरजू प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कोकणात, महाराष्ट्रात जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वे सुरू करून इतर एक्सप्रेसला जनरल अनारक्षित बोगी जोडण्याची मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे.

कोकण रेल्वे मार्गावरून दोन्ही दिशेकडील अनारक्षित दैनंदिन आंतरराज्य रेल्वे पूर्ववत सूरू करण्यात याव्यात. गाडी क्रमांक 01003 तुतारी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 50105 दिवा-मडगाव पॅसेंजर, गाडी क्रमांक 10103 मांडवी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 50103  दादर-रत्नागिरी पॅसेंजर , गाडी क्रमांक 12133 मँगलोर एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 10111 कोकणकन्या एक्सप्रेसममध्ये अनारक्षित बोगी उपलब्ध करून द्याव्यात. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वे लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघाकडून केली आहे.
कोकण रेल्वेच्या मुंबई- मडगाव मार्गावर कोकणवासीयांच्या गर्दीचा भार आहे. यासह आरक्षित तिकिटांची कमी आहेत. त्यामुळे अनारक्षित दैनंदिन रेल्वे, एक्सप्रेसला अनारक्षित बोगी जोडण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. मात्र, या मागणीकडे  सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना तिकीट मिळत नसल्याने रस्ते मार्गांनी प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे कोकणवासीयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी दिली.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

भुसावळ ते वर्धा, भुसावळ ते नरखेड, नागपूर ते वर्धा, नागपूर ते चंद्रपूर, भुसावळ ते नासिक-इगतपुरी, नरखेड ते काझीपेठ, वर्धा  ते नागपूर या गाडीत बडनेरा वरून हजारो प्रवासी मुर्तिजापूर, अकोला इथे कामाला जातात, त्यांचेही फार हाल होत आहेत. 
सर्वसामान्य प्रवाशांना लाभदायक असलेली पॅसेंजर गाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाकडून करण्यात येत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर वसई ते सावंतवाडी पॅसेंजर / स्लो एक्सप्रेस सुरू करण्यासाठी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने खासदार गोपाळ शेट्टी यांना निवेदन देण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या वसई, नायगाव, नालासोपारा, विरार परिसरात कोकणातील लोकवस्ती ही साधारण एकूण लोकवस्तीच्या अर्धी आहे.  त्यामुळे कोकणवासीयांची मागणी पूर्ण करावी, अशी भूमिका संघटनेकडून मांडण्यात आली. नायगाव - ज्यूचंद्र येथील पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणाऱ्या फाटकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. या फाटकामुळे पश्चिम रेल्वेला कोकण रेल्वे व उर्वरित महाराष्ट्र जोडला जाईल, अशी मागणी प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जडयार यांनी केली.

=-----------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

mumbai train latest updates Passenger demand to start general passenger train marathi live news