esakal | मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी यासिन भटकळसह दोघांवरील आरोप निश्चित
sakal

बोलून बातमी शोधा

court

मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी यासिन भटकळसह दोघांवरील आरोप निश्चित

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : मुंबईमधील तिहेरी बाॅम्बस्फोट खटल्यातील (Mumbai Bomb explosion) आरोपी यासिन भटकळसह (yasin Bhatkal) दोघांवर आज विशेष न्यायालयात (Court) आरोप निश्चित करण्यात आले. दहा वर्षांपूर्वी झालेल्या या बाॅम्बस्फोटामुळे मुंबई हादरली होती. आरोपींना व्हिडीओ कॅान्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. इंडियन मुजाहिद्दीनचा (Indian Mujahideen) हस्तक असलेल्या भटकळसह एजाज सईद शेखवर (Ajaj sheikh) आरोप निश्चित करण्यात आले. मोक्का, युएपीए (terrorist Action) यासह हत्या, कटकारस्थान, हत्यारे कायदा इ नुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. दोन्ही आरोपी सध्य दिल्लीत तिहार कारागृहात (tihar jail) आहेत. त्यांनी या आरोपांना अमान्यता दिली आहे. हैदराबाद बाॅम्बस्फोट खटल्यात (सन 2013) त्यांना फाशीची सजा सुनावली आहे. (Mumbai triple bomb explosion case terrorist allegations final by court)

हेही वाचा: BMC : 'या' प्रस्तावाला भाजप, कॉंग्रेसचा विरोध, शिवसेनेची होणार कोंडी ?

मुंबईतील तिहेरी बौम्बस्फोट खटल्यासाठी तेथील न्यायालयात हजर करा अशी मागणी आरोपींनी केली होती. मात्र फाशी सुनावल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना हजर करण्यासाठी न्यायालयाने नकार दिला. भटकळला अनेकदा व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. मात्र आरोप निश्चित करण्याबाबत त्याने नकार दिला होता. यामुळे खटल्याला विलंब होत आहे असेही त्याला सांगितले होते, असे न्यायालय म्हणाले. न्यायालयाने खडसावल्यावर व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे आरोप निश्चित करायला भटकळने सहमती दिली.

मुंबईमध्ये झवेरी बाजार, ओपेरा हाऊस आणि दादर कबूतर खानाजवळ तीन बॅाम्बस्फोट सन 2011 मध्ये झाले होते. यामध्ये 27 निष्पाप नागरिक आणि 127 जण गंभीर जखमी झाले होते. भटकळने भायखळ्यातील एका भाड्याच्या खोलीत राहून बॅाम्ब तयार केले आणि प्लान्ट केले, असा आरोप एटीएस पोलिसांनी ठेवला आहे.

loading image