Mumbai : अंधेरी विधानसभा निवडणुकीसाठी 25अर्ज  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Mumbai : अंधेरी विधानसभा निवडणुकीसाठी 25 अर्ज 

मुंबई : अंधेरी पूर्व निवडणुकीसाठी थेट लढत ही शिवसेना आणि भाजप या पक्षांमध्ये आहे. परंतु या पोट निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या निव़डणुकीसाठी एकुण २५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. परंतु मुख्य लढत ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यामध्ये असणार आहे. 

प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आरोपांची मालिका सुरू झाली आहे. ऋतुजा लटके यांच्या नजीकच्या मानल्या जाणाऱ्या संदीप नाईक यांनी मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर प्रश्न निर्माण केले आहेत. तसेच हायकोर्टातही धाव घेणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. 

अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी कोणाचे उमेदवारी अर्ज ?

मुरजी पटेल (भारतीय जनता पार्टी)(भारतीय जनता पार्टी), ऋतुजा लटके (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), निखिलकुमार ठक्कर (अपक्ष), चंद्रकांत मोटे (अपक्ष), संदेश जाधव (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया), मनोज नायक (राईट टू रिकॉल), अर्जुन मुरडकर (अपक्ष), आकाश नायक (भारत जनाधार पार्टी), मल्लिकार्जुन पुजारी (महाराष्ट्र विकास आघाडी), चंदन चतुर्वेदी (उत्तर भारतीय विकास सेना), राजेश त्रिपाठी (उत्तर भारतीय विकास सेना), संदीप नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), निकोलस अलोदा (अपक्ष)

साकिब नफुर इमाम मलिक (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी), श्रीमती फर्झाना सिराज सय्यद (ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टी), अंकुशराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी/अपक्ष), बाळा विनायक (आपली अपनी पार्टी), वाहिद खान (अपक्ष) आणि निर्मल नागबतूला (अपक्ष), राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष) अशा एकुण २५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.