esakal | Mumbai University | अभ्यासक्रमाच्या सत्राचा कालावधी पूर्ण होण्याअगोदरच विद्यापीठाला परीक्षेची घाई
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai University | अभ्यासक्रमाच्या सत्राचा कालावधी पूर्ण होण्याअगोदरच विद्यापीठाला परीक्षेची घाई

मुंबई विद्यापीठाने आयोगाचे नियम धाब्यावर बसवून  हे सत्र संपण्यापूर्वीच पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा आयोजित  केल्या आहेत.

Mumbai University | अभ्यासक्रमाच्या सत्राचा कालावधी पूर्ण होण्याअगोदरच विद्यापीठाला परीक्षेची घाई

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई - विद्यापीठ अनुदान आयोगाने पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक सत्राचा कालावधी 90 दिवस इतका आहे. तो पूर्ण झाल्यानंतरच विद्यापीठ आणि महाविद्यालयांना आपल्या परीक्षा आयोजित करता येतात. मात्र मुंबई विद्यापीठाने आयोगाचे नियम धाब्यावर बसवून  हे सत्र संपण्यापूर्वीच पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा आयोजित  केल्या आहेत.

कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाअंतर्गत असलेल्या अनेक महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश उशिरा सुरू झाले आहेत. तर काही ठिकाणी पदव्युत्तर पदवीचे प्रवेश सुरू आहेत. अशा परिस्थिती विद्यापीठाने 10 मार्च पूर्वी प्रथम वर्ष पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्र परीक्षा पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. 
सध्या मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग हे सहा आठवड्यापूर्वी सुरू झाले आहेत. त्यामुळे त्यांचे सत्र अद्यापही पूर्ण होणे बाकी आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून कला (एमए), विज्ञान (एमएससी), वाणिज्य (एम.कॉम) अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या अध्यापनाला सुरूवात असून अजूनही अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश देणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने 10 मार्चपूर्वी परीक्षा संपवण्याच्या सूचना दिल्याने याविषयी विद्यार्थी संघटनेने जोरदार आक्षेप घेतले आहेत.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरात अद्यापही  वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाले नाहीत आणि त्यांचा अभ्यास अर्धवट राहिला आहे.प्रात्यक्षिके झाली नाहीत, तासिकाही पुरेशा झालेल्या नाहीत असे असताना परीक्षा कोणत्या आधारे घ्यायच्या, असा सवाल प्राध्यापकांकडून करण्यात आला आहे.

---------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

Mumbai University complete the examination before the completion of the course session marathi news updates