मुंबईत बहुतांश महाविद्यालयातील जागा फुल्ल; पदवी प्रवेशाबाबत जाणून घ्या सविस्तर

पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर
 admission
admissionsakal media
Updated on

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) अंतर्गत येणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयातील (reputed colleges) पदवी प्रवेशाची (degree admission) दुसरी गुणवत्ता यादी (second list) जाहीर झाली. यावेळी मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील पदवी प्रवेशाची दुसरी मेरिट ही ९० टक्केहून वर पोहोचली आहे. तर या यादीत बहुतांश महाविद्यालयातील जागा पूर्ण (admission full) भरल्या आहेत. नामांकित महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या गुणवत्ता यादीत जागा पूर्ण भरल्याने ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकले नाही, त्यांना आता ३० ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या तिसऱ्या गुणवत्ता यादी पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

 admission
तरुणीच्या लग्नाला विरोध करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सुमारे 836 हून अधिक महाविद्यालयातील प्रथम वर्ष पदवीच्या बीए, बीकॉम, बीएससी, बीएएफ, बीएमएम आदी अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी १७ ऑगस्ट रोजी जाहीर झाली होती. त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर झाली असून यात यावेळी कला,‍ वाणिज्य आणि विज्ञान शाखेसोबत इतर व्यावसायिक अभ्‍यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांनी आपली पसंती दर्शवली असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन उद्यापासून ३० ऑगस्टपर्यंत प्रवेश करून घेता येतील.

काही महाविद्यालयातील मेरिट

रुईया महाविद्यालय

बीए (इंग्रजी माध्यम) - ९५ टक्के

बीएस्सी - ८४ टक्के

बीएस्सी (कॉम्पुटर सायन्स) - ९२.८० टक्के

बीएमएम

आर्टस् -९५ टक्के

कॉमर्स -९३.६७ टक्के

सायन्स - ९२.१७ टक्के

आरडी नॅशनल महाविद्यालय

बीकॉम ७० टक्के

बीए ५०.१५ टक्के

बीएस्सी ४४.९२ टक्के

विल्सन महाविद्यालय

बीएएमएमसी, कला ९३ टक्के

बीएएफ ९१.३३ टक्के

बीकॉम ८७.२ टक्के

बीएस्सी आयटी ८७.६७ टक्के

सेंट झेवियर्स महाविद्यालय

विज्ञान ९०.५० टक्के

इतर ९१.०० टक्के

 admission
बोरिवली उड्डाण पुलाचा बांधकामाचा खर्च तब्बल ३०० टक्क्यांनी वाढला; वाचा सविस्तर

रुपारेल महाविद्यालय

बीए - ८८ टक्के

बीकॉम- ९०.८३ टक्के

बीएससीआयटी : गणित विषयातील गुण - ८२ टक्के

बीएमएस : कॉमर्स - ८८.१६ टक्के

बीएससी (कॉम्पुटर सायन्स) - ८२.३३ टक्के

साठ्ये महाविद्यालय

बीए - ७३..५ टक्के

बीकॉम - ८७.१६ टक्के

बीएससी - ८६.६६ टक्के

बीएससीआयटी : गणित विषयातील गुण - ८२ टक्के

पोद्दार महाविद्यालय

बीकॉम - ९५.६७ टक्के

बीएमएस : आर्टस् -९३.०४ टक्के

सायन्स - ९३.६७ टक्के

कॉमर्स - ९६.५ टक्के

इतर - ८८.८३ टक्के

डहाणूकर महाविद्यालय

बीकॉम - ८४.६६ टक्के

बीएमएस : कॉमर्स - ८८.३३ टक्के

सायन्स - ७२.१६ टक्के

बॅफ - ८८.१६ टक्के

बीबीआय - ७७.५० टक्के

बीएफएम - ८२.०५ टक्के

बीएस्सीआयटी : गणित विषयातील गुण - ६३ टक्के

हिंदुजा महाविद्यालय

बीकॉम - ९०.३२ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com