esakal | कुलगुरुंनी महागाड्या गाड्या घेतल्या असतील तर माहिती घेऊ - उदय सामंत | uday samant
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

कुलगुरुंनी महागाड्या गाड्या घेतल्या असतील तर माहिती घेऊ - उदय सामंत

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : प्रत्येक विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या शुल्काचा (student fees) पैसा हा विद्यापीठांमध्ये जमा होतो. मात्र या पैशावर मुंबई विद्यापीठासह (mumbai university) इतर विद्यापीठातील कुलगुरूंनीही (vice chancellor) महागड्या गाड्या (costly vehicles) घेतल्या असतील तर त्याची माहिती घेतली जाणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी आज मुंबईत सांगितले.

हेही वाचा: वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांनी ६० लाखांहून अधिक किंमतीच्या गाड्या खरेदी केल्याचे प्रकरण नुकतेच विद्यापीठाच्या सिनेटमध्ये गाजल्यानंतर त्याची चौकशी ही उच्च शिक्षण विभागाकडून केली जात असून त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर विद्यापीठाच्या कुलगुरूंनीही अशा प्रकारच्या महागड्या गाड्या घेतल्या असून त्याची माहिती घेतली जाणार असल्याचे सामंत म्हणाले. तसेच कुलगुरू हे पद सचिव अथवा प्रधान सचिव या स्तरावरचे असते.

त्यामुळे राज्यपाल, मुख्यमंत्री, प्रधानसचिव आदींचा अपवाद वगळता कॅबिनेट मंत्री यांनाही १२ लाखांच्या पुढे गाडी खरेदी करता येत नाही. असे असताना ५० ते ५५ लाखांहून अधिक किंमतीच्या गाड्या या विद्यार्थ्यांच्या शुल्काच्या पैशावर कशा घेतल्या जातात, असा सवालही त्यांनी केला. तसेच गाड्या खरेदी करण्यासाठी नुकताच एक जीआर काढण्यात आला होता.

हेही वाचा: वरळी डेपोचे विद्युतीकरण पूर्ण; बेस्‍टच्या हरित गतीशीलता प्रवासाला चालना

त्यातही गाडी खरेदी करण्यासाठी कोणाला किती लाखांची करता येते त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. अशा वेळी सचिवांच्या स्तरावर असलेल्या कुलगुरूंकडून ५० ते ५५ लाखांची गाडी कशी खरेदी केली गेली हा विषय मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये आला होता अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी खरेदी केलेल्या महागड्या गाडीची चौकशी करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाकडून लवकरच समिती गठीत केली जाणार आहे. त्यासाठी विभागाकडून तयारीही करण्यात आली असल्याचे मंत्रालयातील अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

जगातील सुंदर संगीत महाविद्यालय होईल

आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय मोठे स्मारक व्हावे, अशी गायिका लता मंगेशकर यांची इच्छा असून विद्यापीठात त्यासाठीच ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या विविध साहित्याचे एक म्युझियम व्हावे, अशी त्यांची इच्छा होती.त्यासाठी ते सहकार्य करायला तयार असून आता मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूकडून शासनाकडे प्रस्ताव आल्यावर अतिशय सुंदर जागातील सुंदर असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय कलिना संकुलात होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

loading image
go to top