मुंबई विद्यापीठाचा  मंगळवारी दीक्षांत समारंभ

File Photo
File Photo
Updated on

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ मंगळवारी (ता. २६) विद्यापीठाच्या फोर्ट येथील दीक्षांत सभागृहात होणार आहे. सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या समारंभात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १ लाख ६८ हजार २३९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

दीक्षांत समारंभाला अंतराळशास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी कुलपती भगतसिंह कोश्‍यारी, कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार आहे. 

यंदा पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील १ लाख ६८ हजार २३९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये ९० हजार ३९३ विद्यार्थिनी, तर ७७ हजार ८४६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी पदवीच्या १ लाख ३९ हजार ८३, तर पदव्युत्तरच्या २९ हजार १५६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत.

तसेच विविध विद्याशाखेतील ४१३ विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि एम.फिल. पदवी देण्यात येणार आहे. प्रा. अविनाश बिनीवाले यांना डी.लिट., तर डॉ. नारखेडे यांना डी. एस्सी. पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.

विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या १४ विद्यार्थ्यांना १९ पदके बहाल करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com