मुंबई : घाटकोपर मेट्रो स्थानकावर 'वाॅक इन व्हॅक्सिनेशन कॅम्प'

corona vaccination
corona vaccinationsakal media

मुंबई : कोरोना (corona) आणि ओमिक्राॅन विषाणूचे (omicron variant) सावट अद्यापही आहे. कोरोना लस (corona vaccines) घेण्याबाबत नागरिक जागृत झाले असून कोरोना लस घेण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक प्रवाशाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी मेट्रो प्रशासनाने (Metro railway authorities) देखील 'वाॅक इन व्हॅक्सिनेशन कॅम्प' (Online vaccination camp) सुरू केले आहे. मेट्रो प्रशासन आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमानाने मुंबईतील घाटकोपर मेट्रो स्थानकात (Ghatkopar Metro station vaccination drive) लसीकरण मोहिम हाती घेतली आहे.

corona vaccination
कल्याण : रेल्वे परिसरात प्रवाशांना लुटणाऱ्या दोन महिला चोरट्यांना अटक

मुंबई शहर आणि उपनगरातील अनेकांचे कोरोना लसीचे दोन डोस घेऊन झाले आहेत. मात्र, अनेक नागरिकांचा पहिला डोस घेऊन झाला आहे. परंतु, लसीचा दुसरा डोस बाकी आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने आणि महापालिकेच्या एन वाॅर्डद्वारे 31 डिसेंबरपर्यंत सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत घाटकोपर मेट्रो स्थानकावर लसीकरण ठेवले आहे. प्रत्येकाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे.

या लसीकरण सर्व नागरिकांसाठी खुले असणार आहे. पहिला आणि दुसऱ्या कोव्हिशिल्डची मोफत लसची व्यवस्था करण्यात आली आहे. 20 डिसेंबरपासून सुरू केलेली मोहिम 31 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी पहिल्या डोस 4 जणांनी घेतला. तर, 25 जणांनी दुसरा डोस घेतला. तर, 21 डिसेंबर रोजी पहिली डोस 2 जणांनी आणि 18 जणांनी दुसरा डोस घेतला. मागील दोन दिवसात 49 जणांनी कोरोना लस घेतली आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाद्वारे देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com