esakal | मुंबईत मुसळधार पावसामुळे तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ, जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai vihar lake

मुंबईत मुसळधार पावसामुळे तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ, जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : तुळशी तलावा पाठोपाठ विहार तलावही (Vihar lake) आज सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास ओसंडून वाहू लागला आहे. दोन दिवसात झालेल्या पावसाने (Mumbai Rain) मुंबईतील तलावांमध्ये 10 दिवसांचा वाढीव पाणीसाठा (Water level) जमा झाला असून सध्या 72 दिवसांचा पाणीसाठा आहे. मात्र,हा पाणीसाठा अपेक्षे प्रमाणे नसल्याने या आठवड्यात पालिकेच्या (BMC) पाणीखात्याची आढावा बैठक होण्याची शक्यता आहे. मुंबईत गेल्या दाेन रात्रींमध्येअतिवृष्टी (Heavy Rainfall) झाली आहे. तर,ठाणे जिल्ह्यातील तलावांच्या क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला आहे. सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 2 लाख 87 हजार 082 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मात्र,अपेक्षेपेक्षा हा पाणीसाठा कमी आहे. (Mumbai Vihar Lake Water level Increases but BMC not Satisficed with this As need of more water-nss91)

गेल्या वर्षी याच दिवशी 3 लाख 86 हजार दशलक्ष लिटर आणि 2019 मध्ये 7 लाख 35 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता.मुंबईसह संपुर्ण कोकण किनारपट्टीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोसमातील 70 टक्क्यांच्या आसपास पाऊस होतो.मात्र,यंदा जुलै महिन्याचा पहिला पंधरावडा कोरडाच गेला होता.त्यामुळे पाणीसाठ्यात अपेक्षीत वाढ झालेली नाही.गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला असून या आठवड्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.‘पाणीसाठ्याचा आणि पावसाचा या आठवड्यात अंदाज घेऊन पुढील निर्णय घेऊ’ असे पालिकेच्या पाणीखात्याकडून सांगण्यात आले. तुळशी तलाव भरल्यानंतर आज सकाळी मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलावही भरला आहे.या धरणाचा संपुर्ण पाणीसाठा 27 हजार 698 दशलक्ष लिटर आहे.तर,या धरणातून रोज 90 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मुंबईला होतो.

हेही वाचा: Breaking: मुंबईला 'ऑरेंज अलर्ट'; पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस

तुळशी तलावात 355 मि.मी पाऊस

रविवार सकाळ पर्यंत दिवसभरात तुळशी तलावात तब्बल 355 मि.मी पावसाची नोंद झाली.तर,विहार तलावात 267 मि.मी,ठाणे जिल्हयाीतल तानसा तलावात 154 मि.मी,भातसा या प्रमुख तलावात 123 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.मोडकसागर मध्ये 113 मि.मी पावसाची नोंद झाली.तर,मध्यवैतरणा धरणाच्या क्षेत्रात 43 आणि नाशिक जिल्हयातील अप्पर वैतरणा मध्ये 14 मि.मी पावसाची नोंद झाली.

मिठीचे टेंशन वाढले

तुळशीतील सांडव्याचे पाणी विहार तलावात येते तर विहार तलावातील सांडव्याचे पाणी मिठी नदीत येते.त्यामुळे आता मिठी नदीतील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वाढणार आहे.त्यामुळे असाच मोठा पाऊस झाल्यास मिठी नदीचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

तलावातील पाणीपातळी (मिटरमध्ये) पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

तलाव - पुर्ण भरल्यावर पाणीपातळी - आजची पातळी - पाणीसाठा

-अप्पर वैतरणा - 603.51---592.71---00

-मोडकसागर---163.15---149.97---34398

-तानसा --128.63---123.21---53946

-मध्य वैतरणा --285---240.48---21631

-भातसा --142.07--115.05----141444

-विहार --80.12---80.12----27697

-तुळशी ----139.17---139.60---8046

loading image