Mumbai Water Cut: मुंबईतल्या 'या' भागात १२ तास पाणी बंद

Water News : नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे |
Mumbai Water Cut: मुंबईतल्या 'या' भागात १२ तास पाणी बंद

Mumbai News: वाशी नाका येथे ७५० मिमी व्यासाची झडप बसवण्याचे काम पालिकेच्या जल विभागाद्वारे हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे काम होणार असल्याने चेंबूर, गोवंडी परिसरातील काही भागांत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरी या भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.

बी. डी. पाटील मार्ग, वाशीनाका येथील गवाणपाडा, एच. पी. सी. एल. रिफायनरी इत्यादी, शेवटच्या भागास पाणीपुरवठ्यामधील दाबामध्ये सुधारणा करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत ७५० मिलीमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्याचे काम गुरुवार १३ जून रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे गुरुवारी चेंबूर गोवंडी परिसरातील काही भागांत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Mumbai Water Cut: मुंबईतल्या 'या' भागात १२ तास पाणी बंद
Nashik Water Cut : शहरात अघोषित पाणी कपात? नाशिककरांवर पाण्याचे संकट!

या भागात पाणीपुरवठा बंद

एम पूर्व विभाग

(बीट क्रमांक १४७ ते १४८) लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीराम नगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

(एच. पी. सी. एल.) वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, भाभा अणु संशोधन केंद्र (बी. ए. आर. सी.), वरुण बेवरेजेस

--

Mumbai Water Cut: मुंबईतल्या 'या' भागात १२ तास पाणी बंद
Nashik Water Cut : पश्‍चिम, सिडको विभागात बुधवारी पाणीपुरवठा बंद

एम पश्चिम विभाग

(बीट क्रमांक १५४ ते १५५)– माहुलगाव, आंबापाडा, जिजामाता नगर, वाशी नाका, मैसूर वसाहत, खाडी मशीन, रामकृष्ण चेंबूरकर (आर. सी.) मार्ग, शहाजी नगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक, चेंबूर छावणी

Mumbai Water Cut: मुंबईतल्या 'या' भागात १२ तास पाणी बंद
Jalgaon Water Cut : जळगावात पाणीपुरवठा आज बंद; एक दिवस पाणी उशिराने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com