Mumbai Water Supply Lakes Level : दिलासादायक बातमी! पाणी कपात लवकरच रद्द होणार; ७ तलावांमध्ये 'इतका' पाणीसाठी

Mumbai Water Supply Lakes Level
Mumbai Water Supply Lakes Level

मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत आहे. या पार्श्वभूमिवर मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे. शहराला पाणी पुरवले जाते त्या सात तलावांच्या परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आता 1 जुलैपासून लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात रद्द होण्याची शक्यता आहे.

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलाव - अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी- तब्बल 48 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईला दररोज होणारा पाणीपुरवठा पाहता हे पाणी जानेवारीपर्यत पुरणारे आहे. त्यामुळे आता मुंबईत सुरु असलेला जोरदार पाऊस असाच सुरु राहिल्यास येत्या काही दिवसात पाणीकपात रद्द होण्याची शक्यता आहे.

Mumbai Water Supply Lakes Level
Maharashtra Politics : अजित पवार मुख्यमंत्री होणार? CM शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्‍‌या सात धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लिटर (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) इतकी आहे. याच्या ४८ टक्के पाणीसाठा जमा झाल्याने पाणीकपतीचे संकट काही प्रमाणात टळले आहे.

Mumbai Water Supply Lakes Level
Gujarat Floods : गुजरातमध्ये मुसळधार पावसाचे थैमान! जुनागडसह इतर भागात पूर; अनेक वाहने गेली वाहून

मुंबईतील पाण्याची सध्याची स्थिती

  1. अप्पर वैतरणा -43 हजार 657 दशलक्ष लिटर (19.20 टक्के)

  2. मोडक सागर - 96 हजार 919 दशलक्ष लिटर (75.17 टक्के)

  3. तानसा - 1 लाख 25 हजार 717 दशलक्ष लिटर (86.66 टक्के)

  4. मध्य वैतरणा - 10 लाख 8 हजार 816 दशलक्ष लिटर (56.23 टक्के)

  5. भातसा - 28 लाख 3 हजार 984 दशलक्ष लिटर (39.61 टक्के)

  6. विहार - 21 हजार 2 दशलक्ष लिटर (75.82 टक्के)

  7. तुळशी - 8 हजार 46 दशलक्ष लिटर (100 टक्के)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com