esakal | मुंबईकर घेतायत सुखद गारव्याचा आनंद, किमान तापमानात घट
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकर घेतायत सुखद गारव्याचा आनंद, किमान तापमानात घट

मुंबईतील किमान तापमान 22 अंशावर आले असून सुखद गारव्याचा अनुभव मुंबईकर घेत आहेत. 

मुंबईकर घेतायत सुखद गारव्याचा आनंद, किमान तापमानात घट

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: राज्यभरात किमान तापमानात घट झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान नोंदवण्यात आले. मुंबईतील किमान तापमान 22 अंशावर आले असून सुखद गारव्याचा अनुभव मुंबईकर घेत आहेत. 

राज्यात आज किमान तापमानाची नोंद झाली. राज्यातील सर्वाधिक किमान तापमान नाशिक येथे 10 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. त्या खालोखाल जळगाव येथे 10.4 किमान तापमान नोंदवण्यात आले. पुणे,जालना आणि मालेगाव  येथे किमान तापमानात घट झाली आहे.

हेही वाचा- संजय राऊतांचा रोखठोकमधून केंद्र सरकारवर घणाघात

उत्तर भारतासह काश्मीर मध्ये थंडीची लाट पसरली आहे. परिणामी दोन दिवसांपासून उत्तर तसेच मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील काही परिसरात किमान तापमानात घट झाली. पुढील 48 तास हे वातावरण कायम राहणार असल्याचे शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
नाशिक -10 
जळगाव - 10.4
पुणे - 10.8
जालना - 11
मालेगाव - 11.2 
Baramati 11.3 
परभणी - 12.4,
महाबळेश्वर - 13.6
औरंगाबाद - 12.5, 
मुंबई - 22

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai weather updates minimum temperature in Mumbai reached 22 degrees

loading image
go to top