
मुंबई - भारतीय स्वातंत्र्यानंतरही आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास राहिलेल्या मांग- मातंग समाजाचा महामोर्चा बुधवारी, २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे. पहिल्यांदाच समाजातील विविध सेवाभावी संस्था,
संघटनांनी एकत्र मोट बांधून हा मार्चा काढण्याची तयारी केली असल्याने या मोर्च्यात मराठवाडा, विदर्भासह राज्यातील लाखो समाजबांधव सहभागी होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
एक मराठा-लाख मराठा या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील काही दिवसांपासून तयारी सुरू आहे. ज्या तालुक्यांमध्ये मांग-मातंग समाजाची लोकवस्ती आहे, अशा ठिकाणी शेकडो बैठका पार पडल्या आहेत. यात मुंबई, नवी मुंबई, चेंबूर, कोल्हापूर, नांदेड, परभणी, लातूर, उदगीर, बुलढाणा, जळगाव, नाशिक, जळकोट, उमरगा आदी शहरात आजपर्यंत बैठका पार पडलया असून पुढील दिवसात उर्वरित सर्व जिल्ह्यात, शहरात बैठका घेतल्या जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
मुंबईतील महामोर्च्यासाठी लागणाऱ्या साहित्यापासून ते लोकांच्या व्यवस्थेपर्यंतचे नियोजन करण्यासाठी काही संघटनांनी जबाबदारी घेतली आहे.शिवाय काही कर्मचारी आणि अधिकारी संघटनांटनीही यावेळी पुढाकार घेतला असल्याने मुंबईतील महामोर्चा हा यशस्वी होईल असा विश्वास विविध संघटनांच्या प्रतिनिधींकडून व्यक्त केला जात आहे.
राज्य सरकारकडून क्रांतीवीर लहुजी वस्ताद आयोगाच्या अनेक शिफारसी अंमलात आणण्यासाठी दिरंगाई करण्यात आली. त्यासाठी मागील अनेक सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. तर मुंबईतील महामोर्च्यात अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणामध्ये 'अबकड' असे वर्गीकरण करावे, तसे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था(आर्टी) स्थापन करावी आदी प्रमुख मागण्या यात केल्या जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.