esakal | मुंबईत महिलेच्या अवयवदानामुळे तिघांना जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

organ donation

मुंबईत महिलेच्या अवयवदानामुळे तिघांना जीवदान

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत यावर्षीचे 25 वे यशस्वी अवयवदान (organ donation) झाले आहे. एका महिलेच्या (woman) अवयवदानातून तिघांचे प्राण वाचवण्यात (saves three people) यश आले आहे.  या महिलेने यकृत, दोन किडनी (kidney) दान केल्या आहेत. या महिलेला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात (hospitalized) दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर, नातेवाईकांना झेडटीसीसीच्या (ZTCC) समन्वयकांनी समजवल्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यातून त्यांनी दोन किडनी आणि यकृत दान केले.

हेही वाचा: जनतेचे आरोग्य महत्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू शकता : मुख्यमंत्री

मुंबईत अवयवदानाच्या मोहिमेला आता उभारी येत असून यावर्षीच्या 20 ऑगस्ट या दिवशी 24 वे अवयवदान झाले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 25 वे अवयवदान नोंदवण्यात आले आहे. कोरोना साथीचा फटका मुंबईसह राज्यातील अवयवदान चळवळीला ही बसला. मात्र, तरी देखील मुंबईत आतापर्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे झेडटीसीसी कडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, अवयवदानाविषयी कोणतीही माहिती देण्याची परवानगी नातेवाईकांनी दिली नसल्याचे झेडटीसीसीच्या समन्वयकांनी सांगितले. हे अवयवदान झेडटीसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार झाले आहे.

loading image
go to top