लसीकरण: सरकारी की खासगी? पाहा मुंबईकरांची पसंती कशाला...

लसीकरणाच्या बाबतीत मुंबई देशात अव्वल
Vaccination
VaccinationRepresentative
Summary

लसीकरणाच्या बाबतीत मुंबई देशात अव्वल

मुंबई: राज्यासह मुंबईत सर्वत्र लसीकरणाने दीड महिन्यापूर्वी जोर धरला. सुरूवातीला विक्रमी लसीकरण करणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचाही समावेश होता. लसींचा तुटवडा असल्याने कालांतराने लसीकरण मोहिमेची गती काहीशी कमी झाली. पण तरीदेखील विविध केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू आहे. सरकारी आणि खासगी (Private Vaccination Center) अशा दोन्ही केंद्रांवर लस घेता येते. पण लसीकरणासाठी मुंबईकर (Mumbaikars) सरकारी रुग्णालयांवरच अधिक विश्वास दाखवत असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत एकूण लसीकरणापैकी (Covid Vaccination) 77 टक्के लसीकरण हे सरकारी लसीकरण केंद्रावर झालं आहे. लसीकरण हा थेट आरोग्याशी निगडित विषय असल्याने लोकांना सरकारी यंत्रणा (Government Vaccination Centers) अधिक विश्वासार्ह वाटते. तसेच सरकारी केंद्रांवर मोफत लसीकरणाशिवाय मुबलक साठा असल्यानेदेखील लोकांचा त्यास अधिक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. (Mumbaikars are more comfortable with Government Vaccination Centers than Private Centers)

Vaccination
"जे 'मुंबई मॉडेल'वर हसतात, त्यांना माहिती कशी देऊ?"

मुंबईसह राज्यभरात 16 जानेवारी रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला पालिकेच्या तसेच राज्य सरकार, त्यानंतर खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी मिळाली. सध्या मुंबईत 159 लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. मुंबईत गुरुवारपर्यंत 25 लाख 80 हजार 787 लाभार्थींचे लसीकरण झाले. त्यापैकी कोव्हिशिल्डचे 24 लाख 11 हजार 842 तर कोव्हॅक्सीनचे 1 लाख 68 हजार 945 डोस देण्यात आले. त्यात पहिल्या डोससाठी 19 लाख 99 हजार 236 तर दुसऱ्या डोससाठी 5 लाख 81 हजार 551 चा समावेश होता.

Vaccination
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध - अजित पवार

मुंबईत एकूण 159 लसीकरण केंद्र सुरू आहेत. त्यात पालिकेची 71, केंद्र/राज्य सरकारची 17 व खासगी 74 लसीकरण केंद्र आहेत. सरकारी लसीकरण केंद्रांपेक्षा खासगी केंद्र अधिक असली तरी सरकारी केंद्रांवर लसीकरण अधिक झाले आहे. गुरुवारपर्यंत सरकारी केंद्रावर 77% तर खासगी रुग्णालयात केवळ 23% लसीकरण झाले आहे. पालिकेची एकूण 71 लसीकरण केंद्र असून 17 लाख 24 हजार 925 लाभार्थींचे लसीकरण झाले आहे. केंद्र व राज्य सरकारचे एकूण 17 केंद्र असून तेथे 2 लाख 26 हजार 294 लाभार्थींचे लसीकरण तर खासगी रुग्णालयांत एकूण 74 लसीकरण केंद्र असून त्यात 6 लाख 25 हजार 968 लाभार्थींचे लसीकरण झाले आहे.

एकूण लसीकरण

हेल्थ केअर वर्कर - 2 लाख 87 हजार 990

फ्रंट लाईन वर्कर - 3 लाख 36 हजार 243

ज्येष्ठ नागरिक - 10 लाख 39 हजार 607

45 ते 59 वयोगट - 9 लाख 03 हजार 644

18 ते 44 वयोगट - 13 हजार 303

(संपादक- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com