मुंबईकरांनो खबरदारी घेताय ना! शहरात कोरोनासह या आजारांच्या रुग्णांची नोंद

तुषार सोनवणे
गुरुवार, 9 जुलै 2020

मुंबईकरांना कोरोनासोबतच या आजारांनाही तोंड देण्यासाठी सज्ज रहावे लागणार आहे. पावसाळ्यातील आजारांचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले असले तरी, कोरोनामुळे यंत्रणेवरचा ताण पाहता आपणच अधिकची काळजी घेणे महत्वाचे आहे.

 

मुंबई – मुंबई आणि उपनगरात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोनामुळे बाधितांच्या संख्या एवढी झालीये की, आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. हे सर्व कमी की काय आता पावसाळ्यामुळे पावसाळी आजारांनी तोंड वर काढले आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोरोनासोबतच या आजारांनाही तोंड देण्यासाठी सज्ज रहावे लागणार आहे. पावसाळ्यातील आजारांचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले असले तरी, कोरोनामुळे यंत्रणेवरचा ताण पाहता आपणच अधिकची काळजी घेणे महत्वाचे आहे.

तोडफोड करणारा 'तो' आरोपी CCTV त कैद, पोलिसांकडून तपास सुरु 

गेल्या आठवड्यात शुक्रवार पासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. सलग तीन-चार दिवसाच्या मुसळधार पावसाने तापमानामुळे होणारी अंगाची लाई लाई थांबवली आहे. परंतु पावसाळा सुरू झाल्याने हिवताप, डेंग्युसारख्या साथीच्या आजारांनीही तोंड वर काढायला सुरूवात केली आहे. जून महिण्यात मुंबई शहरात हिवतापाचे 300 रुग्ण आढळून आले होते तर, डेंग्यूचे चार आणि लेप्टोस्पायरोसिसचा एक रुग्णाची नोंद झाली आहे. तसेच शहरात 163 हिवतापाचे, एक लेप्टो आणि डेंग्यूच्या सहा रुग्णांची नोंद झाली होती.

चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का; शोले चित्रपटातील सुरमा भुपाली यांचे निधन...

ही रुग्णांची संख्या पाहता गेल्यावर्षीच्या मे महिण्यात हिवतापाच्या रुग्णांची संख्या अर्ध्याहून कमी नोंदवली गेली आहे. परंतु असे असले तरी, मे महिण्याच्या तुलनेत जून मध्ये या आजारांच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. हा चिंतेचा विषय बनला आहे. मागील वर्षी ज्या प्रमाणात या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी दिसून येत आहे.

सध्याच्या कोरोना काळात आजाराची लक्षणांमध्ये फरक करता येणे तेवढे सहज शक्य नसणार आहे. कोरोनाच्या लक्षणांमध्येही ताप, सर्दी, खोकला, उलटी होते. हिवताप-डेंग्यू या आजाराचीही लक्षणं तीच आहेत. त्यामुळे सध्या अशा रुग्णांच्या पावसाळी आजाराच्याही चाचण्या केल्या जातात. त्याप्रमाणे त्याच्या आजाराचे निदान केले जाते.

कोरोनासह अन्य आजारांच्या संसर्गाचा धोका

कोरोनाच्या संसर्गाचे थैमान आणि इतर आजारांचा संसर्गाचा धोक्याच्या पार्श्वभूमीवर जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे. एकाच रुग्णाला एकापेक्षा जास्त आजारांचा संसर्ग झाल्यास, रुग्णाच्या जीवाला धोका संभवू शकतो. त्यामुळे हिवताप, आणि डेग्य़ूंसारखे आजार बळावू नये म्हणून आता मुंबईकरांनी अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

साथीच्या आजारांची रुग्णसंख्या

हिवताप            डेंग्यू          लेप्टो

मे २०१९       २८४            ६            १

मे २०२०       १६३            ३             १

जून २०१९     ३१३            ८           ५

जून २०२०      ३२८            ४          १

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbaikars are not careful! Record of patients with these diseases including corona in mumbai