मुंबईकरांना पहाटे सुखद गारव्याची अनुभूती; तापमानात घट

समीर सुर्वे
Sunday, 29 November 2020

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पहाटे सुखद गारव्याची अनुभूती जाणवत आहे.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पहाटे सुखद गारव्याची अनुभूती जाणवत आहे.
 
आज पहाटे मुंबई आणि उपनगरात 23-24 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आर्द्रता 60-70 टक्के इतकी आहे. त्यामुळे पहटे गारवा वाढल्याचे दिसते. पूर्वेकडून वाहणारे मंद वारे, ताशी 7-10 किमी वेगाने वाहत आहेत. त्यामुळे गार हवेची झुळूकही मुंबईकरांना अनुभवास मिळत आहे. 

दुपारी 32-34 अंश  सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, पुढील काही दिवस ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

--------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbaikars experience pleasant morning bliss; also Decrease in temperature

Tags
टॉपिकस
Topic Tags: