मुंबईकरांनो संकट टळलेलं नाही! वांद्रे, कुलाब्यात कोरोना संसर्गात वाढ; उत्तर मुंबईची परिस्थिती जैसे थे

समीर सुर्वे
Saturday, 29 August 2020

:उत्तर मुंबईतील कोव्हिड संसर्गावर प्रतिबंध असला तरी अद्याप रुग्णवाढीचा दर 1 टक्‍क्‍यां पेक्षा खाली आलेला नाही.

मुंबई -:उत्तर मुंबईतील कोव्हिड संसर्गावर प्रतिबंध असला तरी अद्याप रुग्णवाढीचा दर 1 टक्‍क्‍यां पेक्षा खाली आलेला नाही. तर,कुलाबा आणि वांद्रे पश्‍चिम प्रभागात आठवडाभरात संसर्गाच्या दरात किंचीत वाढ नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारी नोंद झालेल्या कोव्हिडच्या नव्या रुग्णांपैकी 31 टक्के रुग्ण हे मुंबईतील पाच प्रभागांमधील असून कुलाबा येथे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 10 दिवसांनी घटला आहे.

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

मुंबईत 28 ऑगस्ट रोजी 1 हजार 180 नव्या रुग्णांची नोंद झाली.त्यातील 31 टक्के रुग्ण हे बोरीवली,कांदिवली,दहिसर,वांद्रे पश्‍चिम,कुलाबा आणि गोरेगाव या विभागांमधील मधील आहे.या पाच विभागांमध्ये 326 नव्या रुग्णांची नोंद झाली.त्यातील बोरीवली आर मध्य प्रभागात सर्वाधिक 128 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.अशी माहिती महानगर पालिकेच्या साथ नियंत्रण विभागा मार्फत जाहीर करण्यात आली आहे.

जुलैच्या दुसऱ्या पंधरावड्या पासून उत्तर मुंबईत कोविडचा संसर्ग वाढू लागला.या भागांमध्ये चेस द व्हायरस मोहीम राबवून पालिकेने संसर्गावर नियंत्रण मिळवले.मात्र,आर मध्यसह कांदिवली आर दक्षिण,दहिसर आर उत्तर या प्रभागातील कोविडवाढीचा दर 1 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे.मुंबईत कोविड वाढीचा सरासरी दर 0.78 टक्‍क्‍यां पर्यंत आला आहे. आर मध्य प्रभागात 22 ऑगस्ट रोजी रुग्णवाढीचा दर 1.53 टक्के होता.तो आता 1.47 टक्‍क्‍यांवर आला आहे.तर,आर दक्षिण प्रभागात रुग्णवाढीचा दर 1.17 टक्‍यांवरुन 1.26 टक्‍क्‍यांवर वाढला आहे.

वसईत पालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वादात 'जनता गेली खड्डयांत';  रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिक हैराण

तर,दहिसर मध्येही किंचीत वाढ नोंदविण्यात आली आहे.येथे 22 ऑगस्ट रोजी 1.14 टक्के दर होता.तो 1.23 टक्‍क्‍यांवर आला आहे.गोरेगाव पी दक्षिण प्रभागात 22 ऑगस्ट रोजी रुग्णवाढीचा दर 0.98 टक्के होता.मात्र,तो आता वाढून 1.01 टक्‍क्‍यांवर पोहचला आहे.तज्ञांच्या मते कोणत्याही साथीच्या आजारातील रुग्णवाढीचा दर 1 टक्‍क्‍यां पेक्षा कमी झाल्यास संसंर्गाला प्रतिबंध झाल्याचे मानले जाते.गोरेगाव प्रमाणेच कुलाब ए प्रभागाची परीस्थीती आहे.तेथे 22 ऑगस्ट रोजी रुग्णवाढीचा दर 0.95 टक्‍के होता.तर,आता 1.11 टक्के आणि एच पश्‍चिम वांद्रे,सातांक्रुझ खार पश्‍चिम परीसरातील रुग्णवाढीचा दर 1.05 टक्‍क्‍यांवरून 1.14 टक्‍क्‍यांवर आला आहे.

या पाच प्रभागा पैकी बोरीवलीत 128,कांदिवली 76,दहिसर 46,वांद्रे पश्‍चिम 56,कुलाबा 33 आणि गोरेगाव येथे 33 नव्या रुग्णांची नोंद 28 ऑगस्टला झाली आहे.

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

रुग्ण दुप्पट होण्यचा कालावधी (दिवसात)

  • - प्रभाग         28 ऑगस्ट            22 ऑगस्ट
  • -आर मध्य     48                        48
  • -आर दक्षिण   55                        60
  • आर उत्तर      57                        61
  • एच पश्‍चिम    61                        67
  • कुलाबा          63                       73
  • गोरेगाव         69                        71

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbaikars have not avoided the crisis! Increase in corona infection in Bandra, Colaba; The situation in North Mumbai was like this