मुंबईकर बेजबाबदार? एका दिवसात तब्बल 'इतक्या' जणांवर गुन्हे दाखल

मुंबईकर बेजबाबदार? एका दिवसात तब्बल 'इतक्या' जणांवर गुन्हे दाखल

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहे. मुंबईत कोरोनाचे दिवसेंदिवस नवीन रुग्णांचा आकडा समोर येतो. त्यामुळे आणखीनच चिंता वाढली आहे. बाहेर फिरताना मास्क वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. मात्र तरी सुद्धा काही बेजबाबदार नागरिक मास्क घालत नाही. त्यामुळे पोलिसांनी अशा नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली. याच नियम न पाळणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेनं नवे नियम आणलेत. मास्क वापरण्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेनं नवा आदेश जारी केला आहे. यापुढे जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शहरात मास्क वापरणे सक्तीचे आहे. असं असताना  ही काही बेजबाबदार नागरिक मास्क घालत नाही. अशांवर गुरुवारी  पोलिसांनी थेट गुन्हे नोंदवले आहेत.

मुंबईत  गुरूवारी पोलिसांनी तब्बल ७४ जणांवर मास्क न घातल्या प्रकरणी कारवाई केली आहे. या सर्वांवर १८८ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 

पोलिसांनी केलेल्या कारवाईत दक्षिण मुंबईत मास्क न घातल्याप्रकरणी ६ जणांवर कारवाई करण्यात आली. पूर्व मुंबईत १६ जणांवर, पश्चिम उपनगरात ५ जणांवर, तर उत्तर मुंबईत हे सध्याचे कोरोनाचे हॉटस्पॉट असताना या ठिकाणी ४७ जणांवर मास्क न घातल्याप्रकरणी कारवाई पोलिसांनी केली आहे. त्या शिवाय ५ पेक्षा जास्त व्यक्ती जमल्या प्रकरणी ७ हजार ६९२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर कलम १८८ चे उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १३ हजार ८६२ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आलेत.

अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, पोलिस, नर्सेस अहोरात्र मेहनत घेताहेत. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणे तसंच सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तोंडाला मास्क लावूनच बाहेर फिरणं प्रशासनानं अनिवार्य केलं आहे.

30 जून ते ५ जुलैपर्यंत इतक्या जणांवर कारवाई

30 जून- 35
1 जुलै- 16
2 जुलै- 17
3 जुलै- 12
4 जुलै- 7
5 जुलै- 1

एकूण- 88

29 जून रोजी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मास्क वापरण्या संदर्भात नवा आदेश जारी केला. यापुढे जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार, असा आदेशचं त्यांनी काढला. मात्र नवीन आदेश काढल्यानंतर कारवाईत कमालीची घट झाली आहे. गेल्या आठवड्यात, मार्शलनी 602 लोकांना मास्क न घातल्याबद्दल चेतावणी (warned) दिली.

Mumbaikars not wearing masks 74 persons action taken against on thursday

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com