esakal | मुंबईकरांनो लक्ष द्या! लॉकडाउन गाईडलाईन्सचा 'हा' मेसेज करू नका फॉरवर्ड

बोलून बातमी शोधा

Fake mesaage
मुंबईकरांनो लक्ष द्या! लॉकडाउन गाईडलाईन्सचा 'हा' मेसेज करू नका फॉरवर्ड
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्ण संख्या कमी होतेय, ही चांगली बाब आहे. पण म्हणून मुंबई महापालिकेने निर्बंध कुठेही शिथील केलेले नाहीत. लॉकडाउन आणखी १५ दिवसांसासाठी वाढवला असून, आजपासून लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु झालेला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर नव्या लॉकडाउन नियमावलीबद्दलचा एक बनावट मेसेज फिरतोय. व्हायरसची साखळी मोडण्यासाठी सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलाय.

महापालिकेच्या लोगोसह हा बनावट मेसेज फिरतोय. या मेसेजमध्ये गॅस एजन्सी, स्टेशनरी शॉप, जनरल स्टोअर्स यांना ठराविक वेळेत दुकाने उघडण्याची परवानगी दिल्याचे म्हटले आहे. मुंबई महापालिकेने हा मेसेज बनावट असून अशा कुठलीही नियमावली जारी केलेली नाही, हे स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने यापूर्वी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वेच लागू आहेत, याची कृपया नोंद घ्यावी, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. अशा अफवांवर विश्वास ठेऊन नका आणि असे मेसेजेस फॉरवर्ड करु नका, असे आवाहन महापालिकेने केलेय. मुंबईत कोरोना पॉझिटिव्हिटि रेट १० टक्क्यांच्या खाली आला आहे.