मुंबईकरांनो, जाणून घ्या रविवारचा मेगाब्लॉक कोणत्या मार्गावर असणार! वाचा बातमी

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 4 जुलै 2020

लॉकडाऊन नंतर बऱ्याच दिवसांनी अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यासाठी लोकल ट्रेन सेवा सुरू झाल्याने उद्या (8 जुलै) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वाचा त्यासंबधीची अधिकची माहिती

उद्या मेगाब्लॉक

मेन लाईन
कधी व कुठे : रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत विद्याविहार-ठाणे स्थानकांदरम्यान 'अप' व 'डाऊन' जलद मार्गावर. 
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 2.30 दरम्यान सुटणाऱ्या 'डाऊन' जलद मार्गावरील विशेष सेवा माटुंगा ते दिवा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर. या लोकल निर्धारित थांबे घेऊन दिवा स्थानकानंतर पुन्हा जलद मार्गावर.

दिवा येथून सकाळी 9.58 ते दुपारी 3.18 पर्यंत सुटणाऱ्या 'अप' जलद विशेष सेवा दिवा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर. या लोकल निर्धारित थांबे घेऊन माटुंगा स्थानकानंतर पुन्हा जलद मार्गावर.

हार्बर लाईन
कधी व कुठे : रविवारी सकाळी 11.25 ते दुपारी 4.25 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चुनाभट्टी 'डाऊन' मार्गावर आणि सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत चुनाभट्टी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 'अप' मार्गावर. 

मुंबईतील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 11.15 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पनवेलला जाणाऱ्या 'डाऊन' मार्गावरील विशेष सेवा बंद.
सकाळी 9.45 ते दुपारी 2.41 या वेळेत पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या 'अप' मार्गावरील विशेष सेवा बंद.
मेगाब्लॉक कालावधीत कुर्ला फलाट क्रमांक 8 वरून पनवेलसाठी विशेष लोकल. हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाईनमार्गे परवानगी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbaikars, there will be a megablock on Sunday