रात्री आठपर्यंत मुंबईकरांना असेल चक्रीवादळाचा धोका, 'असा' असेल वादळाचा मार्ग 

रात्री आठपर्यंत मुंबईकरांना असेल चक्रीवादळाचा धोका, 'असा' असेल वादळाचा मार्ग 

मुंबई - निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेनं घोंघावत येत आहे. आज सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 3 जून ते 4 जूनपर्यंत चक्रीवादळ महाराष्ट्रात घोंघावणार आहे.. 

राज्यासह मुंबईत असा असेल निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग

3 जून 

दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबागहून मुंबई किनारपट्टीवर येईल. त्यानंतर वरळीमार्गे ठाण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करेल. 

रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ठाणे पाचवड येथून चक्रीवादळ भिवंडी, उम्बरपाडा, वाडामार्गे इगतपुरीच्या दिशेला मार्गक्रमण करेल. 

4 जून 

पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ खोडाला पोहचेल. इगतपुरी येथून त्र्यंबकेश्वर, हरसुल, कपराडामार्गे वणीच्या दिशेनं मार्गक्रमण करेल. 

पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळ वणी, सापुतारा येथून अभोणा, कळवण, सटाणा, नामपूरला मार्गे साक्री येथे धडकेल. 

पहाटे 4 वाजेच्या सुमारास साक्री म्हसदी येथून हे चक्रीवादळ लामकानी, चिमठाणेमार्गे वर्शीला धडकणार आहे. 

निसर्ग चक्रीवादळ सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वर्शी, थाळनेर येथून लामकानी, चिमठाणेमार्गे शिंदखेड्याला पोहचेल.

सकाळी 9 वाजेच्या सुमारास शिंदखेडा, जैतपूर येथून शिरपूरमार्गे चक्रीवादळ धुळ्यात धडकेल. 

सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हे चक्रीवादळ मध्यप्रदेशच्या खरगोणमध्ये धडकेल. 

मुंबईत यंत्रणा सज्ज 

या वादळासोबतच मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असून मुंबईत पूरस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल राज्य सरकारच्या यंत्रणांशी समन्वय साधून पावले टाकत आहेत.

मुंबई ठाण्यात पावसाला जोर 

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यासह कल्याण आणि बदलापूरमध्ये जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मुंबईत ही पाऊस सुरु आहे. ठाण्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. कल्याणमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. नवी मुंबईसह पनवेल परिसरातही पाऊस पडतोय. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com