डॅडींच्या 'दगडी चाळी'वर लवकरच पडणार हातोडा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॅडींच्या 'दगडी चाळी'वर लवकरच पडणार हातोडा!

डॅडींच्या 'दगडी चाळी'वर लवकरच पडणार हातोडा!

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन (underworld don) अरुण गवळीचा (arun gawli) बालेकिल्ला म्हणून कुप्रसिद्ध असलेली दगडी चाळ (dagdi chawl)लवकरच पाडली जाणार आहे. दक्षिण-मध्य मुंबईत आग्रीपाडा येथे असलेल्या दगडी चाळीत एकूण १० इमारती आहेत. या दगडी चाळीची मालकी अरुण गवळीकडे आहे. ९० च्या दशकात मुंबईत गँगवॉर जोरात सुरु होतं. त्यावेळी दगडी चाळ अनेक कारवायांचं मुख्य केंद्र होतं. दाऊद आणि गवळी गँगमधील थरार दगडी चाळीने अनुभवला आहे. अनेक मोठे गुन्हेगार या चाळीच्या आश्रयाला यायचे. चोर खोल्या, तळघर हे दगडी चाळीचे वैशिष्टय. (Mumbais once infamous underworld den dagdi chawl to be replaced by skyscrapers)

अरुण गवळी राजकारणाकडे वळल्यानंतरही दक्षिण मुंबईत दगडी चाळीचं महत्त्व वाढलं होतं. लवकरच दगडी चाळ पाडून तिथे गगनचुंबी टॉवर उभे राहणार आहेत. नगरसेवक आणि अरुण गवळीची मुलगी गीता गवळीने दगडी चाळ पाडणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. "दगडी चाळीत ३५० भाडेकरु राहतात. त्यांना ४५० चौरस मीटरची घर मिळतील" असे गीता यांनी सांगितले.

"आम्ही नियोजनाच्या टप्प्यावर आहोत. पूनर्विकासासाठी आम्ही स्थानिक विकासक निश्चित केला आहे" असे गीता यांनी सांगितले. क्लस्टर अंतर्गत दगडी चाळीचा पूनर्विकास करण्यात येईल. अरुण गवळीने दगडी चाळीत बसून अंडरवर्ल्डवर राज्य केले. तिथे त्याचा दरबार भरायचा. गुन्हेगारांची इथे सतत ये-जा असायची. पोलिसांच्या छापेमारीमुळे ही चाळ नव्वदच्या दशकात सतत चर्चेत असायची.

सध्या गवळी कुटुंबीय दगडी चाळीत चौथ्या मजल्यावर राहते. तळमजल्यावर अखिल भारतीय सेनेचे कार्यालय आहे. अरुण गवळीनेच या पक्षाची स्थापना केली आहे. "म्हाडाने दगडी चाळीच्या पूनर्विकासाला प्राथमिक परवानगी दिली आहे. दगडी चाळीच्या पूनर्विकासासाठी आम्ही लेटर ऑफ इंटेट दिले आहे" असे म्हाडाचे चेअरमन विनद घोसाळकर यांनी सांगितले.

loading image
go to top