कोरोनामुळे मुंबईतील खासगी शाळा आर्थिक संकटात; वर्गखोल्यांचे भाडे रखडले

तेजस वाघमारे
Wednesday, 27 January 2021

कोरोनामुळे अनेक पालकांनी शुल्क न भरल्याने खासगी शिक्षण संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत.   मुंबई महापालिका शाळांच्या वर्गखोल्यांचे वार्षिक भाडे रखडले आहे

मुंबई  : कोरोनामुळे अनेक पालकांनी शुल्क न भरल्याने खासगी शिक्षण संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत.   मुंबई महापालिका शाळांच्या वर्गखोल्यांचे वार्षिक भाडे रखडले आहे. महापालिका शाळांच्या सुमारे दीड हजार वर्गात 211 खासगी शाळा भाडेतत्वावर चालवण्यात येतात. या शाळा या वर्षात न भरल्याने यंदाचे वर्गखोल्यांचे अनुदान माफ करावे अशी मागणी महामुंबई शिक्षण संस्था संघटनेने केली आहे.

महापालिका शाळांच्या सुमारे दीड हजार वर्गात 211 खासगी शाळा भाडेतत्वावर चालवल्या जातात. यंदा कोरोनामुळे शाळा सुरू झालेल्या नाहीत. या शाळांना शिक्षण विभागाकडून अनुदान मिळत नसल्याने विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या फीच्या पैशातूनच शाळा चालविली जाते माञ बहुसंख्य पालकांनी आर्थिक अडचणींमुळे पाल्याची फीदेखील भरलेली नाही. यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती व उर्दू माध्यमाच्या अनुदानित व विनाअनुदानित खाजगी शाळांचा समावेश आहे. वर्गखोल्यांसाठी दरवर्षी 10 टक्केवाढीने वार्षिक भाडे आकारले जाते. वार्षिक भाड्यापोटी सुमारे 2.50 कोटी इतकी रक्कम शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पालिकेकडे अग्रीम स्वरुपात भरले जाते. माञ यंदा कोरोनामुळे मार्च 2020 पासून शाळाच बंद आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतलेले नाहीत. त्यामुळे फी अभावी शाळा आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच महापालिकेने 2001 पासून अनुदानित प्राथमिक शाळांना वेतनेतर अनुदान दिलेले नाही. राज्य सरकारकडे 2003 पासून अनुदानित शाळांना 1 टक्के दराने देय असलेले इमारत भाडे अनुदानही थकलेले आहे.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्या वाचा एका क्लिक वर

भाडेतत्त्वावरील 2 हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सुमारे 40 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील आणि मागसवर्गीय समाजातील आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी पालिकेने या वर्गखोल्यांचे भाडे माफ करण्याची मागणी महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे कार्यवाह सदानंद रावराणे, सहकार्यवाह विनय राऊत यांनी केली आहे.

-----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Mumbais private schools in financial crisis due to corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbais private schools in financial crisis due to corona mumbai marathi news