esakal | मुंबईची पाणीकपात 10 टक्क्यांवर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईची पाणीकपात 10 टक्क्यांवर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा दिलासा

मुंबईत सध्या सुरु असलेली 20 टक्के पाणीकपात 10 टक्‍क्‍यांवर आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार 21 ऑगस्टपासून 10 टक्केच पाणी कपात करण्यात येणार आहे. ऐन सणांच्या मुहूर्तावर पालिकेच्या निर्णयामुऴे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईची पाणीकपात 10 टक्क्यांवर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा दिलासा

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : मुंबईत सध्या सुरु असलेली 20 टक्के पाणीकपात 10 टक्‍क्‍यांवर आणण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार 21 ऑगस्टपासून 10 टक्केच पाणी कपात करण्यात येणार आहे. ऐन सणांच्या मुहूर्तावर पालिकेच्या निर्णयामुऴे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

...तर CBI च्या पथकाला क्वारंटाईन व्हावे लागेल; BMC ने स्पष्ट केली भूमिका

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या 12 लाख 32 हजार 302 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. एकूण साठ्याच्या हे प्रमाण 85 .14 टक्के आहे.  हा पाणीसाठा लक्षात घेता पुढील वर्षी 31 जुलैपर्यंत पाणी पुरण्यासाठी 10 टक्के कपात पुरेशी असल्याने पालिकेने कपात कमी करण्यचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने 5 ऑगस्टपासून मुंबईत 20 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली. ऑगस्टच्या सुरूवातीला तलावात 34 ते 35 टक्के पाणीसाठा होता. मात्र, त्यानंतर 19 दिवसांत पाणीसाठा 50 टक्‍क्‍यांनी वाढला. तलाव क्षेत्रात या आठवड्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे.

घरपट्टीबाबत भिवंडी पालिकेने घेतला धाडसी निर्णय, अन् मिळवला अनोखा मान

मुंबईस ठाणे शहराला आणि भिवंडीलाही पालिका काही प्रमाणात पाणी देते. त्यांनाही पालिकेच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. तुलसी, विहार या दोन तलावांसह मोडकसागर तलावही मंगळवारी ओसंडून वाहू लागला आहे. त्याच बरोबर तानसा 92.18 टक्के आणि मध्य वैतरणा 91.71 टक्के भरला आहे.

पाणीसाठा (दशलक्ष लिटर )
तलाव                         -सध्याचा पाणीसाठा-                अपेक्षित पाणीसाठा
- अप्पर वैतरणा -            158549                            227047
-मोडकसागर                  128925                           128925
-तानसा                         133734                            145080
-मध्य वैतरणा                 177488                             19350
- भातसा                        597863                             717037
- विहार                         27698                               27698
- तुलसी                         8046                                 8046

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top