कुंभमेळ्यावर बोलणारे बोलभांड आता कुठे आहेत? - भाजपा आमदार

मुंब्र्यात ईदच्या गर्दीवरुन ठाकरे सरकारवर निशाणा
Atul-Bhatkhalkar
Atul-Bhatkhalkar

मुंबई: राज्यात लॉकडाउन असताना, काल मुंब्र्यामध्ये (mumbra market) ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी उसळली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाला. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे. पण काल मुंब्र्याच्या बाजारपेठेत या नियमांचे कुठेही पालन झाले नाही. त्यावरुन कांदिवलीचे भाजपा आमदार अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात ठाकरे सरकारवर (slam thackeray govt) टीका केली आहे. (mumbra market crowded by people for eid bjp mla atul bhatkhalkar slam thackeray govt)

"मुंब्र्यात ईदची तोबा गर्दी आहे, कारण हे बोटचेपे ठाकरे सरकार फक्त हिंदूंना कायद्याचा बडगा दाखवू शकते...कुंभमेळ्यावर बोलणारे बोलभांड आता कुठे आहेत?" असा सवाल त्यांनी टि्वटमधून विचारला आहे. "मुंब्र्यामध्येच लसीकरणाला विरोध झाला. पहिल्या लाटेच्यावेळी आयसोलेशन सेंटरमध्ये जायला विरोध झाला. याच मुब्र्यात रमजानच्या नावाखाली लोकं हिंडत आहेत. हे वारंवार सिद्ध झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार असलेल्या बेस्ट सीएमच्या राज्यात वेगवेगळया धर्मीयांना वेगवेगळया न्याय आहेत. त्यामुळे हा महाभकास आघाडीचा सेक्युलरजिम आहे" अशी टीका भातखळकर यांनी केली.

Atul-Bhatkhalkar
Maratha Reservation: 'तर पुनर्विचार याचिका दाखल करावीच लागली नसती'

"कुंभमेळ्यावर टि्वट करणारे सेक्युलर जितेंद्र आव्हाड कुठे आहेत? मंत्री आणि आमदार म्हणून त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. हे मतांच्या लालसेपायी राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष करण्याच काम सरकारकडून सुरु आहे" अशी टीका भातखळकर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com