

eknath shinde
esakal
राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या इच्छुकांना आज (२ जानेवारी) अर्ज मागे घेण्याची शेवटची संधी आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत ही मुदत असल्याने राजकीय पक्षांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरी करून स्वतंत्रपणे अर्ज भरलेल्या उमेदवारांची समजूत काढण्यासाठी सर्वच पक्षांना ही शेवटची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यभरात बंडखोरांची भूमिका काय राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.