भिवंडीतील पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द? महाविकास आघाडीत जुंपन्याची शक्यता

भिवंडीतील पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द? महाविकास आघाडीत जुंपन्याची शक्यता

भिवंडी  : नगरसेवकपद वाचवण्यासाठी भिवंडी पालिकेतील कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. या नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, या नगरसेवकांना नवी मुंबईतील कोकण विभागीय कार्यालयात बोलवून आयुक्त भाऊसाहेब मिसाळ यांनी सुनावणीद्वारे त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्व कागदपत्रांची तपासणी करून उद्या, (5 जानेवारी) हजर रहावे, असे आदेशही त्यांनी दिल्याने सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. 

तीन वर्षा पुर्वी महापालिकेच्या महापौर ,उपमहापौर पदाच्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाचा 18 नगरसेवकांनी घोडेबाजाराला बळी पडून पक्षाशी दगाबाजी करून कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केले.त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका राका यांचा पराभव झाला.त्यामुळे 18 फुटीर नगरसेवकांचे पद रद्द करण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक जावेद दळवी यांनी नवी मुंबई कोकण विभागीय आयुक्त यांच्या कडे केल्यामुळे या नगरसेवकांना 

भिवंडी पालिकेचा महापौर निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा 18 नगरसेवकांनी पक्षा आदेश झुगारून कोणार्क विकास आघाडीच्या महापौर पदाचा उमेदवारास मतदान केले. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका प्रदिप राका पराभव झाला. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाचा पक्षादेश झुगारून विरोधकांना मदत करणाऱ्या 18 नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी कोकण आयुक्तांना आदेश देण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेसचे पालिकेचे नगरसेवक माजी महापौ जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्त आयुक्त यांच्या केली त्यामुळे 18 नगरसेवकांना नोटीस बजावली होती.त्यामुळे काल दुपारी पालिकेचे नगरसेवक 18 पैकी 5 नगरसेवक कोकण विभाग कार्यालयात हजर झाले होते. त्यांचे मत कोकण आयुक्त भाऊसाहेब मिसाळ यांनी ऐकून नोंदवून घेतले चारशिट केली. कागदपत्रे तपासणी वेळ हवा आहे. अशी मागणी वकीलांनी केल्यामुळे कोकण आयुक्तांनी दोन्ही बाजू ऐकुन घेत सदर नगरसेवकांना 5 जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

या नगरसेवक रद्द पदावर टांगती तलवार.. 

1) श्रीम. नमरा औरंगजेब अन्सारी

2)श्रीम. मिस्बा इमरान खान

3) श्री. इमरान वली मोहमद खान

4) श्री. अहमद हुसेन मगृ सिद्धीकी

5) श्री. अरसद मो. असलम अन्सारी

6) श्रीम. शबनम महबूब रहमान असारी

7) श्रीम. अझुम अहमद हुसेन सिद्धीकी

8) श्री. मलिक अ नजीर अ मोमीन

9) श्रीम. जरीना नफीस अन्सारी

10) श्रीम. साजेदा बानो इश्‍तियाक मोमीन

11) श्रीम. शकिरा बानो इम्तियाज अहमद शेख

12) श्रीम. समिना सोहेल शेख

13) श्रीम. राबिया मो. शमीम अन्सारी

14) श्री. तफजूल हुसेन मकसूद हुसेन अन्सारी

15) श्रीम. शिफा अशफाक अन्सारी

16) श्री. नसरुल्ला नूर मोहम्मद अन्सारी

17) श्रीम. हुस्ना परवीन मोह. याकूब अन्सारी

18) श्री.मतलुब अफझल खान 

Municipal notice to 18 rebel Congress corporators in Bhiwandi

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com