मुंबईत हॉटेल- रेस्टॉरंट चालकांसाठी पालिकेची नियमावली जारी

पूजा विचारे
Friday, 2 October 2020

सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणारेत.  महाराष्ट्र राज्य सरकारने अनलॉक पाच संदर्भात नियमावली जाहीर केलीये. या नव्या नियमावलीप्रमाणे आता राज्यातील रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु होणारेत.

मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. दरम्यान राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात राज्यात पुन्हा ३० ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला. मात्र अनलॉक ५ च्या प्रक्रियेत टप्प्याटप्प्यानं काही गोष्टी पुन्हा सुरु करण्यात येताहेत. अनलॉक ५ च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणारेत.  महाराष्ट्र राज्य सरकारने अनलॉक पाच संदर्भात नियमावली जाहीर केलीये. या नव्या नियमावलीप्रमाणे आता राज्यातील रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु होणारेत.

५० टक्के क्षमतेनं ही आस्थापाने सुरु होणारेत. येत्या ५ तारखेपासून महाराष्ट्र राज्य सरकारने हॉटेल्स, बार्स आणि रेस्टॉरंट्स सुरु करण्यास आता परवानगी दिलेली आहे. गेल्या सहा महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. मात्र यावेळी मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणारेय. 

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारनं दिलेल्या नियमानुसार मुंबईत सुद्धा येत्या सोमवारपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार सुरु होतील. राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमावलीसोबतच मुंबई महापालिकेनंही इतर काही नियम जारी केलेत. त्यामुळे मुंबईतल्या नागरिकांना आणि हॉटेल मालकांना राज्य सरकारच्या नियमावलीसोबतच मुंबई पालिकेच्या नियमांचंही पालन करावे लागेल. 

मुंबई पालिकेनं हॉटेल मालकांसाठी जारी केलेली नियमावली खालीलप्रमाणे

  • सोमवारी मुंबईत हॉटेल- रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर हॉटेल्समध्ये टेबलचं प्री- बुकिंग करणं आवश्यक असेल.
  • एका ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळी हॉटेलमध्ये प्रवास करु शकणार नाही.
  • दोन टेबलमध्ये २ ते ३ फुटांचे अंतर असणे गरजेचे.
  • वेळोवेळी टेबल आणि हॉटेलच्या किचनची स्वच्छता होणे आवश्यक असेल.
  • हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविडची चाचणी करणे आवश्यक असेल.
  • गर्दी टाळण्यासाठी  ग्राहकांनी हॉटेलमधील प्री-बुकींग आणि पार्सल पद्धतीवरच भर देण्याबाबत पालिकेच्या वतीने सुचना देण्यात आल्यात. यावरही पालिका नियमावली जारी करणार असल्याचं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे. 

Municipal regulations issued for hotel restaurant operators in Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal regulations issued for hotel restaurant operators in Mumbai