१०० फ्लडिंग पाईटवर पालिकेचा वाॅच

१०० फ्लडिंग पाईटवर पालिकेचा वाॅच

१०० फ्लडिंग पाईटवर पालिकेचा वाॅच

नवीन फ्लडिंग पाईटचा शोध घेऊन
अतिरिक्त मनुष्यबळ करणार तैनात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.९ : मुंबईत ९८ फ्लडिंग पाईट असून फ्लडिंग पाईट असलेल्या ५०० मीटर परिसरातील नालेसफाईवर लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच गरज पडल्यास त्याठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंपाची संख्या वाढवली जाईल. तसेच सलग पाऊस सुरु राहिला तर त्याठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या फ्लडिंग पाईट परिसरात पाणी साचू नये, याची विशेष खबरदारी घेतली जात आहे. परंतु मुंबईत विविध प्राधिकरणांची कामे सुरु आहेत. त्याठिकाणी नवीन फ्लडिंग पाईट निदर्शनास आल्यास त्याठिकाणी तातडीने उपाययोजना करणे यावर लक्ष केल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

पुढील दोन चार दिवसांत जोरदार पावासाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईतील पाणी तुंबण्याच्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करत पावसाच्या पाण्याचा वेळीच निचरा व्हावा यासाठी मुंबईत ठिकठिकाणी उच्च क्षमतेचे ४८२ पंप बसवण्यात येत आहे. मात्र रस्ता खचणे, इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळणे झाडांच्या फांद्या कोसळणे, उघड्या मॅनहोल, त्यातच आता ९८ फ्लडिंग पाईटचा धोका यंदा कायम आहे. मुंबईत गेल्या वर्षीपर्यंत १२७ फ्लडिंग पाईट होते. मात्र पालिका प्रशासनाने उपाययोजना केल्याने २९ फ्लडिंग पाईट कमी झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
--

फ्लडिंग पाईटची ठिकाणे : संंख्या
के वॉर्ड अंधेरी पूर्व-पश्चिम : २३
एफ/उत्तर माटुंगा, शिवडी, वडाळा : ८
ई वॉर्ड भायखळा : ८
एच वॉर्ड वांद्रे-सांताक्रुझ : १५
एल वॉर्ड कुर्ला : ६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com