esakal | मुंबईतील भाजी मार्केट बंद होणार
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील भाजी मार्केट बंद होणार

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विकेंद्रीकरण केलेल्या बाजारातून विक्रेते घेऊन आलेला माल विभागावर विकत आहेत. मात्र त्यानंतरही गर्दी वाढत आहे. विशेष म्हणजे अशा ठिकाणी "सोशल डिस्टसिंगचा' नियम पाळला जात नाही. त्यामुळे पालिका आयुक्तांनी भाजीपाला आणि फळांचे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील भाजी मार्केट बंद होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी कमी होत नाही. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आता विभागानुसार बाजारपेठा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा पोलिस आणि पालिका प्रशासनाचा विचार आहे. 

हे वाचा : किरीट सोमय्या ही उपद्रवी प्रवृत्तीची व्यक्ती 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी दादर पश्‍चिम येथील भाज्यांचा घाऊक बाजाराचे 29 मार्चपासून विभाजन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे दादरमधील भाजीपाला बाजार बंद करून घाटकोपर, दहिसर, मुलुंड, वांद्रे बिकेसी या ठिकाणी सुरू केला आहे. 
नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विकेंद्रीकरण केलेल्या बाजारातून विक्रेते घेऊन आलेला माल विभागावर विकत आहेत. मात्र त्यानंतरही गर्दी वाढत आहे. विशेष म्हणजे अशा ठिकाणी "सोशल डिस्टसिंगचा' नियम पाळला जात नाही. त्यामुळे पालिका आयुक्तांनी भाजीपाला आणि फळांचे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही भाज्या आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी कमी होत नाही. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने बाजार कसे बंद राहतील याची उपाययोजना करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर विचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
 

loading image
go to top