Murbad News: धरणाची जलवाहिनी फुटल्याने कडधान्य पिकाचे नुकसान

नुकसानभरपाई न मिळाल्यास ते तहसीलदार कार्यालया समोर उपोषण करणार
murbad farming photos
murbad farming photos sakal

Kinvhali News: ठाणे पाटबंधारे विभागाच्या डोळखांब धरणातून शेती सिंचनासाठी टाकलेल्या जलवाहिनीची अनेक वर्षे डागडुजीच न केल्याने जागोजागी फुटून त्यातून हजारो लिटर पाण्याची गळती होते.

चार दिवसांपूर्वी जलवाहिनी फुटून शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांच्या कडधान्याचे अतोनात नुकसान झाले आहे.बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्यास ते तहसीलदार कार्यालया समोर उपोषण करणार आहेत.

murbad farming photos
Thane Crime: मुंब्य्रात २२ किलो गांजा जप्त

ठाणे पाटबंधारे विभागाच्या कळवा कार्यालयांतर्गत शहापूर तालुक्यातील डोळखांब येथील धरणातून शेती सिंचनासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या पंचवीस वर्षे जुनी असलेली जलवाहिनी फुटल्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या शेतातील काकडी, कलिंगड व कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

जागोजागी गळती लागलेल्या जलवाहिनीची गेल्या अनेक वर्षांत दुरुस्ती झाली नसून पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी नुकसानग्रस्त शेतकरी दत्तात्रय परशुराम भोईर अशोक तुकाराम भोईर , नामदेव गोपाळ भोईर ,गुरूनाथ पांडुरंग भोईर,हनुमंत हरी भोईर ,कमल चंद्रकांत राऊत व अन्य शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.(murbad today marathi news)

murbad farming photos
Thane News : ठाण्यातील ११ विद्यार्थीनींकडून कर्तव्यपथावर नृत्य सादर

"बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी अन्यथा येत्या 15 फेब्रुवारी रोजी शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल!"

-दत्तात्रय परशुराम भोईर, शेतकरी, बांधनपाडा

"मुख्य जलवाहिनीवरून क्षमतेपेक्षा जास्त जोडण्या झाल्याने सातत्याने गळती होते,किरकोळ दुरुस्ती केली असली तरी कायमस्वरूपी दुरुस्तीच्या निधी मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत!"

सुनील दांडकर,उपअभियंता

लघुपाटबंधारे उपविभाग मुरबाड- शहापूर(murbad latest News)

murbad farming photos
Thane News : भाजप शिवसेनेत जुंपणार, आरक्षित भुखंडावर असेल तर ती शाखा हलविली जाईल - सरनाईक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com