मुरलीधर जाधव यांनी उंचावली मुंबई पोलिसांची मान! नागरिकांनी खांदयावर घेत दिल्या शुभेच्छा

सुमित बागुल
Friday, 1 January 2021

३१ तारखेच्या रात्री एकीकडे नागरिक नवीन वर्षाचे स्वागत करण्यात गुंग होते.

मुंबई : ३१ तारखेच्या रात्री एकीकडे नागरिक नवीन वर्षाचे स्वागत करण्यात गुंग होते. तर दुसरीकडे मुंबई पोलिस शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रात्रभर ड्युटीवर होते. मुंबई पोलिस ड्युटीवर असताना मुंबईकरांना कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही, असं बोललं तर त्यात काहीही अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण, मुंबई पोलिस मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कायमच कटिबद्ध असतात आणि हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवल आहे. 

३१ डिसेंबरनंतरच्या पार्ट्यांमध्ये मुंबईकर व्यस्त असताना मुंबईतील धारावीत एका घरात मोठाला अजगर आठळून आला.  रात्री अचानक घरात अजगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र मुंबई पोलिस दलातील एका पोलिसामुळे या नागरिकांची चिंता मिटली आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. 

मुंबई भागातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Mumbai News in Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali 

काय आहे प्रकरण ? 

एकीकडे थर्टीफस्टच्या मूडमध्ये मुंबईकर असताना धारावीतील एका घराच्या पहिल्या मजल्यावर तब्बल सहा फुटी मोठा अजगर आढळून आला. आता घरात अजगर आढळून आल्याने घरच्यांसह आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र मुंबई पोलिस दलातील एका शूर पोलिसांमुळे या अजगराला घराबाहेर काढण्यात आलं. मुरलीधर जाधव असं या धाडसी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मुरलीधर जाधव यांनी दाखवलेल्या धीटपणामुळे  आणि अजगराला घराबाहेर काढल्यानंतर नागरिकांनी एकाच जल्लोष केला आणि टाळ्या देखील वाजवल्या. मुरलीधर यांनी सुखरुपरित्या अजगराला पकडलं, त्यानंतर काहींनी मुरलीधर यांना उचलून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्यात.  

मुरलीधर जाधव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे नागरिकाचा जीव तर वाचलाच. सोबतच  मुरलीधर यांच्या कामगिरीमुळे मुंबई पोलिसांची मान देखील उंचावली आहे. 

murlidhar jadhav rescued six feet long indina rock python from dharavi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murlidhar jadhav rescued six feet long indina rock python from dharavi