भाईंदरमधील टपाल कार्यालयात मूषकराज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

सुळसुळाटामुळे कामकाज ठप्प; पोस्टमनकाकांची ऑफिससाठी वरिष्ठांना हाक

भाईंदर ः भाईंदर पश्‍चिम परिसरातील एकमेव असलेल्या भारतीय टपाल कार्यालयात उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे. संपूर्ण कार्यालयात मूषकराज पसरल्यामुळे कार्यालयातील कामकाज चक्क दोन दिवस बंद ठेवण्यात आले असून पोस्टमनकाकांवर कुणी ऑफिस देते का ऑफिस, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

भाईंदर पश्‍चिम परिसरात असलेल्या टपाल कार्यालयाचा वापर टपाल सेवेसाठी आहे; परंतु सध्या हे ऑफिस वेगळ्याच कारणाने गाजत असून त्याला चक्क उंदीर कारणीभूत आहेत. वाढत्या उंदरांच्या वावरामुळे कार्यालय बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

या टपाल कार्यालयात रजिस्टर एडी, स्पीड पोस्ट, कुरिअर आणि पार्सल करण्यासाठी ग्राहकांची सातत्याने रांग लागलेली असते; परंतु कार्यालयातील वाढत्या उंदरांच्या संख्येमुळे उपलब्ध असलेल्या मुख्य यंत्रणांनाच उंदरांनी आपले मुख्य भोजन बनवले आहे. उंदरांनी कुरतडून टाकलेल्या वायर आणि साधनांमुळे नाईलाजाने कार्यालयातील कामकाज बंद ठेवण्याची वेळ येथील कर्मचाऱ्यांवर आली आहे. 

पत्रे, कुरिअरच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न
प्रशासनातर्फे भारतीय टपाल सेवेकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे अनेक ठिकाणी उपलब्ध असलेल्या टपाल कार्यालयाची दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. योग्य निगा, अपुरे मनुष्यबळ यासारखी अनेक कारणे आतापर्यंत समोर आली आहेत. कार्यालयात वाढत्या उंदरांवर नियंत्रण ठेवण्यास प्रशासन खंबीर नसल्यामुळे आपण पोस्ट करत असलेली पत्रे, कुरिअर आदीदेखील कितपत सुखरूप राहत असतील, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

टपाल कार्यालयातील उंदरांच्या वाढत्या वावरामुळे होणारे नुकसान याबाबत वरिष्ठांना तक्रार केली आहे. ते लवकरच योग्य व्यक्तीला पाठवून समस्या दूर करतील.
रामचंद्र खरपडे, पोस्टमास्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mushak Raj at the post office in Bhayandar near Mumbaiभाईंदर, ता. २४ (बातमीदार) ः भाईंदर पश्‍चिम परिसरातील एकमेव असलेल्या भारतीय टपाल कार्यालयात उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे. संपूर्ण कार्यालयात मूषकराज पसरल्यामुळे कार्यालयातील कामकाज चक्क दोन दिवस बंद ठेव